AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मतदान मग लग्न, बोहल्यावर चढण्याआधीही नवरदेवाचे मतदान

वर्धा : लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवतंच. मात्र, वर्ध्यातील तरुणाने अनोख्या प्रकारे मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला. अल्लीपूर येथील एक नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलं आहे. चेतन गोठे असे या युवकाचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे राहणारा चेतनचे  आज लग्न आहे. […]

आधी मतदान मग लग्न, बोहल्यावर चढण्याआधीही नवरदेवाचे मतदान
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

वर्धा : लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवतंच. मात्र, वर्ध्यातील तरुणाने अनोख्या प्रकारे मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला. अल्लीपूर येथील एक नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलं आहे. चेतन गोठे असे या युवकाचे नाव आहे.

वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे राहणारा चेतनचे  आज लग्न आहे. लग्नाच्या दिवशी घाईगडबड असतानाही चेतनने सकाळी मतदान केंद्रावर जात मतदान केले. विशेष म्हणजे मतदान करताना त्याने नवरदेवाचा पोषाख घातला होता.  मतदान हे आपले कर्तव्य आहे.

प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे निवडणुकीपूर्वी सांगण्यात येते. त्यानुसार चेतननेही मतदान हे कर्तव्य समजत बोहल्यावर उभे चढण्यापूर्वी मतदान केल आहे. या मतदानानंतर त्याचे इतर गावात कौतुक होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून लोकांना मतदानाचे महत्त्व पटत आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिक घराबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. प्रत्येक नागरिकांनी निवडणुकीत मतदान करायला पाहीजे असे मत चेतनने व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये, तर महाराष्ट्रात 7 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडेल. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी विविध मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण पिढी, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध या सर्वांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 116 उमेदवार असून 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत. तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यंदा पहिल्या टप्प्यातील सुमारे 1400 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार असून त्यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचादेखील समावेश आहे. राज्यात सर्वाधिक 30 उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी 5 उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.

पाहा व्हिडीओ:

संबंधित बातम्या :

LIVE : नितीन गडकरींनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, मग हे करा…

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.