मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: त्यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. Shivraj Singh Chouhan corona

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण
| Updated on: Jul 25, 2020 | 1:01 PM

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. “माझ्या प्रिय प्रदेशवासियांनो, मला Covid-19 ची लक्षणे होती, त्यामुळे चाचणी केली असता, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे”, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. (Shivraj Singh Chouhan tested positive for corona )

याशिवाज जे जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी, शिवाय त्यांनी क्वारंटाईन व्हावं, असंही शिवराज सिंह चौहान म्हणाले.

शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करुन आपल्या प्रकृतीची माहिती दिली. “कोरोनाबाबत ज्या मार्गदर्शिका आहेत, त्या सर्वांचं पालन कर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला क्वारंटाईन करुन घेईन. माझं मध्य प्रदेशच्या जनतेला आवाहन आहे की, प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. थोडासाही निष्काळजीपणा कोरोनाला निमंत्रण देतो. मी कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र अनेक लोक कामानिमित्त भेटायला येत होते”, असं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.

कोरोनाचा वेळेत उपचार होतो. कोरोना रुग्ण बरा होतो. मी 25 मार्चपासून दररोज संध्याकाळी कोरोना स्थितीची आढावा बैठक घेतो. आता या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्याचा प्रयत्न करेन, असंही शिवराज सिंह चौहान यांनी नमूद केलं. (Shivraj Singh Chouhan tested positive for corona )