ठाणे जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मैदानात, शिंदे-आव्हाडांकडून उमेदवार जाहीर

| Updated on: Mar 15, 2021 | 7:39 AM

मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार आहे (Thane District Central Co-operative Bank)

ठाणे जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मैदानात, शिंदे-आव्हाडांकडून उमेदवार जाहीर
एकनाथ शिंदे, डॉ. जितेंद्र आव्हाड
Follow us on

शहापूर/ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Thane District Central Co-operative Bank) निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढवण्याचे ठरवले आहे. या निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 15 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे रविवारी जाहीर केली. शिवसेना नेते, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr Jitendra Awhad) यांनी उमेदवारांची घोषणा केली.  (Maha Vikas Aghadi files nomination for Thane District Central Co-operative Bank Election)

मतदान कधी?

मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी येत्या 30 मार्च रोजी मतदान आणि 31 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

उमेदवार कोण?

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील आणि बाबूराव दिघा; तर शिवसेनेचे अमित घोडा हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित पंधरा जागांसाठी महाविकास आघाडीकडून पंडीत पाटील (भिवंडी), सुधीर पाटील (कल्याण) , सुभाष पवार (मुरबाड), मधुकर पाटील (पालघर), प्रकाश वरकुटे (शहापूर), सुनील पाटील (विक्रमगड), किरण सावंत (वाडा) , लाडक्या खरपडे (तलासरी), काँग्रेस (हौसिंग मजुर संस्था), हणमंत जगदाळे (पतसंस्था), निलेश सांबरे (ओबीसी) , अनिल शिंदे (अनुसूचित जाती जमाती), विशाखा खताळ (व्हीजेएनटी), प्राजक्ता पानसरे आणि शोभा म्हात्रे (महिला प्रतिनिधी दोन जागा) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली.

या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून 14, पगारदार पतसंस्थांमधून 1, खरेदी-विक्री संघातून 1, महिला राखीव 2, अनु.जाती-जमातींसाठी 1 आणि ओबीसींसाठी 1 जागा राखीव आहे. 3 हजार 68 मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

संबंधित बातम्या :

परभणी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर, राजकीय पक्ष तयारीला लागले

(Maha Vikas Aghadi files nomination for Thane District Central Co-operative Bank Election)