AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे की नाही? पुण्यातली वज्रमूठ सभा पुढे ढकलण्याची शक्यता

महाविकास आघाडीत सातत्याने सारं काही आलबेल आहे की नाही? याबाबतच्या चर्चा रंगत असतात. यावेळी पुन्हा तशाच चर्चांना उधाण आलं आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण काही घडामोडी तशा घडताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पड्यामागे काय घडामोडी घडत आहेत? असा प्रश्न उपस्थित होतोय.

महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे की नाही? पुण्यातली वज्रमूठ सभा पुढे ढकलण्याची शक्यता
| Edited By: | Updated on: Apr 24, 2023 | 11:18 PM
Share

पुणे : महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे की नाही? अशी चर्चा आता पुन्हा जोर धरु लागली आहे. त्यामागील कारणंही अगदी या चर्चेला समर्पक ठरणारी आहे. सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येतेय तसतसं अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. त्यांनी त्या चर्चांचं खंडन केलं. पण त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं स्पष्टीकरण दिलं. पण आता पुण्यातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

महाविकास आघाडीत सातत्याने बिघाडी झाल्याच्या चर्चा सुरु असतात. महाविकास आघाडीतील नेते सातत्याने एकमेकांना टोला लगावणारे वक्तव्ये करत असतात. पण भाजपला एकटं पाडण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातं. त्यासाठी मविआची वज्रमूठ सभाही पार पडत आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात ही सभा पार पडली. त्यानंतर आता येत्या 1 मे ला मुंबईत सभा आयोजित करण्यात आली आहे. पण त्यानंतर पुण्यात आयोजित करण्यात येणारी सभा ही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात होणारी वज्रमूठ सभा नेमकी कधी होणार?

महाविकास आघाडीची पुण्यात 14 मे ला नियोजित वज्रमूठ सभा आहे. पण या सभेची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून वर्तवली जात आहे. ही सभा 14 मे ला न घेता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे महाविकास आघाडीची सभा पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे पुण्यातील सभा पुढे ढकलण्यात येणार असल्याची बातमी येण्याच्या टायमिंगवरुनही विविध चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपविषयीची भूमिका मवाळ होत चालल्याची चर्चा आहे. तसेच मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेत शरद पवार संबोधित करणार नसल्याची बातमी आधी आली. त्यानंतर शरद पवार हे कोणत्याच वज्रमूठ सभेला संबोधित करणार नसल्याची बातमी सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत.

शरद पवार वज्रमूठ सभेत का संबोधित करणार नाहीत?

भाजपला सभेच्या माध्यमांमधून घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांकडून प्रयत्न केले जात आहे. महाविकास आघाडीच्या याआधीच्या दोन सभांना नागरीक आणि कार्यकर्त्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या मुंबईतील सभेकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. कारण या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: हजर राहून भाषण करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता सूत्रांकडून वेगळीच माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे महाविकास आघाडीच्या आगामी मुंबईतील वज्रमूठ सभेत हजर राहणार नाहीत. विशेष म्हणजे फक्त मुंबईच नाही तर राज्यात होणाऱ्या मविआच्या इतर कोणत्याही वज्रमूठ सभेमध्ये शरद पवार हजर राहणार नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत तीनही पक्षांचे दोन-दोन नेते संबोधित करणार आहेत. वज्रमूठ सभा ही राज्यातील नेत्यांची सभा आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्याने ते या सभेत हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.