Sanjay Raut : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, राऊतांचं ट्विट; उद्धव ठाकरे राजीनामा देणार?

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे यांची सुरतला जाऊन भेट घेतली होती. मात्र, शिंदे यांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर आपल्याकडे 40 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला.

Sanjay Raut : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, राऊतांचं ट्विट; उद्धव ठाकरे राजीनामा देणार?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेनेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 12:02 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आज दुपारीच राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. संजय राऊत यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या ट्विटनुसार विधानसभा बरखास्त झाल्यास मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा बरखास्तीची (vidhansabha) राज्यपालांना शिफारस केली तर ती स्वीकारायची की नाही हे राज्यपाल ठरवतील. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देऊ शकेल असं सांगितलं जातं. त्यामुळे भाजपची पुन्हा एकदा सत्ता येऊ शकेल असं सांगितलं जात आहे. मात्र, राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे यांची सुरतला जाऊन भेट घेतली होती. मात्र, शिंदे यांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर आपल्याकडे 40 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या. त्यात अधिवेशनाला सामोरे जाण्यापासून ते सरकार बरखास्त करण्यापर्यंतच्या विषयावर चर्चा झाली. शिंदे माघारी फिरायाला तयार नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा बरखास्त करण्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून एक प्रकारे आघाडीतील बैठकीतील निर्णयच जाहीर केल्याचं सांगितलं जात होतं.

आधीच संकेत दिले

राऊत यांनी आज सकाळी मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सरकार बरखास्त करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. फार फार काय होईल सत्ता जाईल. पुन्हा सत्ता परत येईल. पण कोणीही मोठा नाही. पक्ष मोठा आहे. पक्ष हाच सर्वोच्च असतो, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अवघ्या तासाभरातच राऊत यांनी ट्विट करून थेट मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडतील. आणि त्यानंतर राज्यपालांकडे आपला राजीनामा फॅक्सने पाठवतील, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.