LIVE : राजकीय घडामोडींचं लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचं लाईव्ह अपडेट
Picture

टीव्ही 9 स्टिंग ऑपरेशन, भाजपचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांना निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा दावा, टीव्ही 9 च्या स्टिंग ऑपरेशनची निवडणूक आयोगाकडून दखल, भाजपचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांना कारणे दाखवा नोटीस

03/04/2019,10:22PM
Picture

अब्दुल सत्तारांचा अपक्ष अर्ज दाखल

औरंगाबाद : काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबाद लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, अब्दुल सत्तार यांच्या उमेदवरीमुळे काँग्रेस समोरचं आव्हान वाढलं, काँग्रेस उमेदवार सुरेश झांबड यांच्यासमोर मोठं आव्हान

03/04/2019,4:05PM
Picture

पवारांची मला साथ हवी - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर – शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची मला साथ पाहिजे, शरद पवारांनी मला राजकारणात आणलं, मी अनेकवेळा निवडणुका लढविल्या, शरद पवारांची साथ सोडली नाही,मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे, सुशीलकुमार शिंदे यांचे काँग्रेस- राष्ट्रवादी निर्धार मेळाव्यात वक्तव्य

03/04/2019,11:08AM
Picture

नाशिकच्या मालेगावात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

नाशिकच्या मालेगावात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल प्रयास अकेडमीच्या जाहिरातीत मोदींचा फोटो, संचालक राज सोळंखी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

03/04/2019,9:31AM
Picture

पुण्यात काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने प्रवीण गायकवाड नाराज

काल झालेल्या काँग्रेस आघाडीच्या बैठकीत गायकवाड गैरहजर, मोहन जोशींना उमेदवारी दिलेल्या काँग्रेस कार्यकर्ते नाराज, प्रवीण गायकवाडांनी अपक्ष निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी, सोशल मीडियाच्या माध्यमातून गायकवाडांना जोरदार पाठिंबा

03/04/2019,9:27AM
Picture

मोहन जोशी, सुप्रिया सुळे आज अर्ज भरणार

पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदावर सुप्रिया सुळे आज उमेदवारी अर्ज भरणार

03/04/2019,8:30AM
Picture

मोदींवरील सिनेमावर बंदी नाही!

‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमावर बंदीला निवडणूक आयोगाचा विरोध, सिनेमातून आचारसंहिता उल्लंघनाचा प्रश्नच नाही, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर निवडणूक आयोगाचं उत्तर

03/04/2019,8:26AM
Picture

कुमार विश्वास यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश

कवी-शायर कुमार विश्वास यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार, दिल्लीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

03/04/2019,8:24AM
Picture

अमित शाह आज जम्मू-काश्मीरमध्ये!

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज जम्मू-कश्मीर आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेणार

03/04/2019,8:22AM
Picture

मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार, ठिकठिकाणी प्रचारसभा घेणार

03/04/2019,8:20AM
Picture

तेजप्रतापची धमकी

माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांची खासगी सहाय्यकाला जीवे मारण्याची धमकी

03/04/2019,7:16AM
Picture

राहुल गांधी पुण्यात येणार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वर्ध्यापाठोपाठ पुण्याच्याही दौऱ्यावर, पुण्यात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, 5 एप्रिलला सकाळी 10 वाजता राहुल गांधींचा पुण्यात कार्यक्रम, अद्याप सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही

03/04/2019,7:13AM
Picture

आव्हाड राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी

आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती

03/04/2019,7:09AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *