LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Picture

सोलापुरात उद्या तिन्ही उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन

सोलापूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उद्या शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सुद्धा रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार

24/03/2019,5:22PM
Picture

किरीट सोमय्यांची उमेदवारी अडचणीत

भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. कारण मनोज कोटक अणि किरीट सोमय्या यांच्यात चुरस असून, सोमय्या यांच्या उमेदवारीला सेनेचाही आक्षेप आहे. दुसरीकडे, मनोज कोटक यांच्या नावावर भाजपमध्ये एकमत आहे.

24/03/2019,1:11PM
Picture

भंडारा-गोंदियातून प्रफुल्ल पटेल रिंगणात उतरणार?

भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल लोकसभा लढण्याची शक्यता असून, विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचा पत्ता कापला जाईल. पटेलांसाठी स्वत: शरद पवार यांचा आग्रह असून, पटेलांचाही लढण्यास होकार आहे.

24/03/2019,1:09PM
Picture

काँग्रेस चंद्रपुरातील उमेदवार बदलणार?

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये काँग्रेसची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता, विनायक बांगडे यांच्याऐवजी शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, संध्याकाळपर्यंत अधिकृतपणे निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

24/03/2019,1:05PM
Picture

कन्हैया बेगूसरायमधून लढणार

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार बिहारमधील बेगूसराय येथून लोकसभा निवडणूक लढणार, भाकपचे नेते सुरवरम रेड्डी यांची घोषणा

24/03/2019,12:13PM
Picture

उस्मानाबादचे शिवसैनिक ताब्यात

मुंबई : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांना दादर पोलिसांकडून ताब्यात, 19 जण ताब्यात, दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे दर्शन घेऊन ‘मातोश्री’कडे जाताना कारवाई

24/03/2019,11:17AM
Picture

शेवाळेंकडून आठवलेंची भेट

मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार, आठवलेंनी दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने शेवाळेंच्या भेटीला महत्त्व, आठवलेंचं समर्थन मिळवण्यासाठी शेवाळेंच्या हालचाली

24/03/2019,10:41AM
Picture

अब्दुल सत्तार-मुख्यमंत्री भेट

मुंबई : काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, गिरीश महाजनही उपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

24/03/2019,10:34AM
Picture

कोल्हापुरात राजकीय रणधुमाळी

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय रणधुमाळी शिगेला, एकीकडे युतीच्या प्रचाराचा शुभारंभ, तर दुसरीकडे आघाडीतील बिघाडी मिटवण्यासाठी प्रयत्न, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोल्हापुरात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या वादावर चर्चा होण्याची शक्यता

24/03/2019,10:21AM
Picture

सेनेत नाराजीनामा!

उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने आमदार ज्ञानराज चौगुले नाराज, चौगुले राजीनामा देणार, सूत्रांची माहिती

24/03/2019,10:18AM
Picture

उस्मानाबादच्या शिवसैनिकांना मुंबईच्या वेशीवर अडवलं!

मानखुर्द : शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापल्यने जाब विचारण्यासाठी 300-400 कार्यकर्ते ‘मातोश्री’कडे रवाना, मात्र मुंबईची वेशीवर मानखुर्द जकात नाक्यावर कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला

24/03/2019,10:11AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *