Maharashtra Floor Test : पुढच्या काही तासात महाराष्ट्रात बहुमत चाचणी, राज्यपाल कोश्यारींच्या 7 सुचना ज्या ठाकरे सरकारला पाळाव्या लागणार

| Updated on: Jun 29, 2022 | 12:19 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करावे असे सांगितले आहे. या पत्रात राज्यापालांनी काही सूचना देखील केल्या आहेत. पाहूयात राज्यपालांनी या पत्रात नेमक्या काय सूचना केल्या आहेत.

Maharashtra Floor Test : पुढच्या काही तासात महाराष्ट्रात बहुमत चाचणी, राज्यपाल कोश्यारींच्या 7 सुचना ज्या ठाकरे सरकारला पाळाव्या लागणार
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर करताच, मंगळवारी रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशा अशयाचे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. उद्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. दरम्यान सध्या दिसत असलेल्या परिस्थितीवरून सध्या तरी महाविकास आघाडीकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यपालांचा हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज पाच वाजता या याचिकेवर सुनावणी आहे. सुनावणीनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र राज्यपालांनी आपल्या पत्रात काही सूचना केल्या आहेत. जाणून घेऊयात राज्यपालांनी नेमंक काय म्हटलंय?

  1. उद्या 11 वाजता फ्लोर टेस्टला सुरुवात होईल, हे विशेष अधिवेशन केवळ बहुमत सिद्ध करण्यासाठीच बोलवण्यात आले असून, त्याचा उद्देश केवळ विश्वासार्हता सिद्ध करणे एवढाच असेल.
  2. फ्लोर टेस्टची संपूर्ण कार्यवाही 11 ते 5 या वेळेतच होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 वाजेच्या आत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  3. मतदान करताना काही गडबड होऊ नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विधानसभेच्या आत आणि बाहेर कडकोट बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका विशिष्ट नेत्याचे प्रक्षोभक वक्तव्य पहाता सुरक्षा व्यवस्थेची गरज असल्याचे राज्यापालांनी म्हटले आहे. मात्र या पत्रात राज्यपालांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतलेले नाही.
  4. हे विशेष अधिवेशन कोणत्याही परिस्थितीमध्ये तहकूब केले जाणार नसल्याचे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. पारदर्शकतेसाठी यादरम्यान होणाऱ्या सभागृहाच्या संपूर्ण कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. त्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना देखील राज्यपालांनी केली आहे.
  7. विधानसभा सदस्यांना मतदान करताना मतदानाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील
  8. विश्वासदर्शक ठरावाच्या संपूर्ण कारवाईचे चित्रकरण विधानसभा सचिलायाच्या वतीने करण्यात येईल, नंतर ते राज्यपालांकडे सादर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133