AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Floor Test : …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच राजीनामा देणार!

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे राजीनामा देऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Maharashtra Floor Test : ...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच राजीनामा देणार!
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2022 | 11:27 AM
Share

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, उद्या बहुमत सिद्ध करावे असे म्हटले आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. आज पाच वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये  औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावाला विरोध झाल्यास मुखमंत्री उद्धव ठाकरे हे आजच राजीनामा देऊ शकतात अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून नामकरणाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले असून, अल्पमतात आल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. उद्या बहुमत सिद्ध करावे असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीकडे पुरेसे आमदारांचे संख्याबळ नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याविरोधात महाविकास आघाडी सरकारने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

आमदारांचा मुक्काम कुठे?

दरम्यान दुसरीकडे आम्ही या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी बंडखोर आमदारांना मुंबईत यावे लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याचा मुक्काम कुठे असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर बोलण्यास बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र हे आमदार सुरत, मुंबई किंवा गोव्यामध्ये मुक्काम करू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान