AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळजाभवानी देवीची सुरक्षा धोक्यात? CCTV कॅमेऱ्यावर संशयाची छाया, आमदाराच्या आरोपाने खळबळ

तुळजाभवानीच्या मंदिराचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मंदिराच्या सुरेक्षावर आमदार कैलास पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

तुळजाभवानी देवीची सुरक्षा धोक्यात? CCTV कॅमेऱ्यावर संशयाची छाया, आमदाराच्या आरोपाने खळबळ
tulja bhavani newsImage Credit source: tv
| Updated on: Aug 14, 2026 | 2:59 PM
Share

श्रीराम क्षीरसागर, टीव्ही9 प्रतिनिधी

तुळजापूर मंदिर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. तुळजापूर मंदिराची सुरक्षा धोक्यात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुळजापूरच्या मंदिरात केंद्र सरकारने बंदी घातलेल्या चिनी कंपनीचे CCTV कॅमेरे बसवल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. कैलास पाटील यांच्या आरोपाने उद्घाटनाआधीच सीसीटीव्ही कमेऱ्यांवर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

तुळजापूर मंदिरातील सीसीटीव्ही कमेऱ्यांचं उद्घाटन होणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं उद्घाटन हे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहेत. परंतु या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कैलास पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. तुळजापूरची सुरक्षा धोक्यात आणत असल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. त्यांनी थेट मंदिर परिसरातील सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. देवीच्या मंदिराच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या कॅमेऱ्यांवरच आता संशयाची छाया पाहायला मिळत आहे. कॅमेरे नेमके कोणत्या कंपनीचे? केंद्राची बंदी लागू आहे का? आणि प्रशासनाने हे कॅमेरे बसवण्यास परवानगी कशी दिली? यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लूट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी 

‘आपण एकीकडे हिंदुत्ववादी सरकार म्हणून मिरवतो. दुसरीकडे हिंदूंच्या मंदिरामध्येच भाविकांच्या भावनेशी असं खेळलं जात असेल, तर याला पाठबळ कोणाचा आहे हे पाहणं गरजेचं आहे. अनेक मंदिरामध्ये लूट झालेल्या बातम्या येतात. त्याचप्रमाणे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली.

तुळजाभवानी मंदिराचा अजब कारभार

तुळजाभवानी मंदिरात अजब कारभार समोर आलाय. भाविकांनी देवीच्या दिव्यात अर्पण केलेलं तेल पुन्हा भाविकांनाच विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंदिर परिसराच्या 200 मीटर अंतरात तेल विक्रीला निर्बंध असतानाही यज्ञ मंडप परिसरातच तेलाची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे 20 मिली तेलाची बॉटल तब्बल 20 रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेशी खेळ होत असल्याचा आरोप करत भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप