AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोलीच्या आश्रम शाळेतील 6 मुलींना सर्पदंश, करा ही सोपी ट्रीक परिसरात असलेले साप दूर निघून जातील, नो टेन्शन

गडचिरोमध्ये नुकतीचं एक दुर्दैवी घटना घडली आहे, एका आश्रम शाळेमध्ये तब्बल सहा मुलींना सर्पदंश झाला, या घटनेत तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. अशा काही ट्रीक्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही सापांना घरापासून दूर ठेवू शकतात.

गडचिरोलीच्या आश्रम शाळेतील 6 मुलींना सर्पदंश, करा ही सोपी ट्रीक परिसरात असलेले साप दूर निघून जातील, नो टेन्शन
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 2:48 PM
Share

काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली होती, झोपेत असलेल्या सहा मुलींना विषारी सापाने दंश केला. सर्पदंशामुळे या सहा पैकी तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घर किंवा घराच्या परिसरात साप निघण्याचा घटनांमध्ये वाढ होते. विशेष: रात्रीच्या वेळी अंधारात साप न दिसल्यामुळे किंवा झोपेत असल्यामुळे सर्पदंश होण्याची शक्यता वाढते. रात्री झोपेत साप चावल्यामुळे सर्पदंश झाल्याचं लक्षात येत नाही, त्यामुळे उपचारासाठी उशिर होतो, अशा स्थितीमध्ये मृत्यू होण्याची देखील शक्यता असेत. या मुलींना जो साप चावला तो मण्यार जातीचा असल्याची माहिती समोर येत आहे.  भारतामध्ये सापांच्या ज्या चार प्रमुख विषारी जाती आढळून येतात, त्यातील ही एक सापाची प्रजाती आहे.

भारतामध्ये नाग, मण्यार, फुरसे, घोणस या चार प्रमुख सापांच्या विषारी प्रजाती आहेत. त्यातील मण्यार ही सापांची प्रजात सर्वात जास्त खरतनाक आहे. या सापाला सायलंट किलर देखील म्हटलं जातं. हा साप निशाचर असतो, त्यामुळे तो शिकारीसाठी शक्यतो रात्रीच बाहेर पडतो.  अशावेळी तो तुमच्या अंथरुणात देखील घुसू शकतो, थोडीजरी हालचाल झाली तरी देखील तो तुम्हाला चावा घेऊ शकतो. या सापाचं वैशिष्ट म्हणजे हा साप चावल्याचं कळत नाही, त्यामुळे उपचाराला वेळ होतो आणि व्यक्ती दगावतो.

सापांना दूर ठेवण्याच्या अनेक ट्रीक आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची ट्रीक म्हणजे कधीही जमिनीवर झोपू नका, नेहमी झोपण्यासाठी पलंग किंवा बाजेचा वापर करा, त्यामुळे सर्पदंशाचा धोका टळतो. तुम्ही जर जमिनीवर झोपले असाल तर तुम्हाला सर्पदंश होऊ शकतो. तसेच पलंगावर कधीही डिझायन असलेलं बेडशिट अंथरू नका, त्याऐवजी पांढऱ्या बेडशिटचा उपयोग करा, पांढऱ्या बेडशिटवर साप लगेच दिसतो, इतर कलरच्या बेडशिटवर साप लवकर दृष्टीस पडत नाही.

तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घराच्या परिसरात गवत वाढतं, लपण्यासाठी जागा मिळाल्याने साप थेट तुमच्या घरापर्यंत पोहचतात, त्यामुळे कधीही पावसाळ्यात गवत वाढू देऊ नका, तुमच्या घराचा परिसर स्वच्छ ठेवा, यामुळे साप तुमच्या परिसरात फिरकणार देखील नाहीत.

Follow Us
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका
सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी...
NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?
संजय शिरसाटांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध