169 चा आकडा पार, महाराष्ट्रात आता ‘ठाकरे सरकार’

| Updated on: Nov 30, 2019 | 4:28 PM

विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) आहे. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले आहे. 

169 चा आकडा पार, महाराष्ट्रात आता ठाकरे सरकार
शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर हात जोडून त्यांचे आभार मानले.
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज मोठा दिवस (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) ठरला. विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) आहे. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले.  महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर 4 सदस्य तटस्थ राहिले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) केले. त्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ज्यांचा मंत्रिमंडळावर यांनी महाविकासआघाडीला पाठिंबा असणाऱ्यांना एका जागी बसण्याचे आदेश दिले.

  • विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने – 169
  • विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात – शून्य
  • तटस्थ – 4
  • विश्वासदर्शक ठराव संमत

या विश्वासदर्शक ठरावावेळी देवेंद्र फडणवीस यासह भाजपच्या सर्व सदस्यांनी वॉक आऊट केलं. त्यानतंर ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. “हे अधिवेशन बेकायदा, मागचं अधिवेशन राष्ट्रगीताने संपलं, नव्या अधिवेशनासाठी राज्यपालांचा समन्स आवश्यक, शिवाय मंत्र्यांचा शपथविधी अवैध, कुणी बाळासाहेबांचं नाव घेतलं, कुणी सोनियांचं, कुणी पवारांचं नाव घेतलं, सर्वांची शपथ अवैध आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधानसभेत सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजता चालू झाले. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाची प्रकिया सुरु झाली. अध्यक्षांकडून सुप्रीमकोर्टाच्या आदेशाचे वाचन करण्यात आले.

नियमित अध्यक्षांच्या निवडीपूर्वी विश्वासमत ठराव का? 170 आकडा तुमच्याकडे आहे तर मग भीती कसली? गुप्त मतदान झालं तर विश्वासमत मिळणार नाही, ही भीती होती, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह चालू आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष बदलण्याची घटना कधीही घडलेली नाही, कोणत्या भीतीने हंगामी अध्यक्ष बदलले? असेही ते (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) म्हणाले. 

याला उत्तर देताना अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले, 1) सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेबाहेर मी काही बोलणार नाही
2) हंगामी अध्यक्ष निवडीचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे, मंत्रिमंडळाने ही निवड राज्यपालांकडे पाठवली, ती मंजूर करुन राज्यपालांनी माजी निवड केली, त्यामुळे निवड कायदेशीर आहे.

हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नाही, रात्री अपरात्री बोलावून असं अधिवेशन होत नाही, आमचे सदस्य ठरावाला पोहचू नयेत म्हणून रात्री निरोप दिला. नोव्हेंबरला राष्ट्रगीत झालं म्हणजे अधिवेशन संस्थगित झालं. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्यपालांच्या समन्सनेच हे अधिवेशन बोलावलं, हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर, तुमचा मुद्दा मी फेटाळून लावतो, विधानसभा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं.