विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक, पंकजा मुंडे समर्थकाचा अर्ज बाद

| Updated on: Nov 14, 2020 | 11:57 AM

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. (Maharashtra graduate and teachers constituency election applications rejected)

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक, पंकजा मुंडे समर्थकाचा अर्ज बाद
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. यातील एकूण 5 मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघातून दाखल केलेल्या 53 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे यांचा अर्ज बाद ठरला आहे. (Maharashtra graduate and teachers constituency election How many applications were rejected)

औरंगाबादच्या पदवीधर निवडणुकीसाठी 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील 8 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर 45 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. बाद झालेल्या अर्जांमध्ये पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांच्याही अर्जाचा समावेश आहे. तर बंडखोर रमेश पोकळे आणि ईश्वर मुंडे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. या पदवीधर निवडणुकीसाठी येत्या 17 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी निवडणुकीत कोणाची लढत होणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.

नागपुरातून पाच अपक्ष उमेदवारांचे अर्ज अपात्र 

तर नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहे. यात अपक्ष उमेदवार वंजारी यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरला आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात आता फक्त 26 उमेदवार उरले आहेत. दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात थेट लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याशिवाय अमरावती शिक्षक मतदारसंघात 28 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. यात 28 उमेदवारांचे 64 अर्ज वैध ठरले आहे. यात संगीता शेंडे-बोंडे यांचा एक अर्ज अवैध ठरला आहे. तर भाजपकडून नितीन धोंडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे रिंगणात उतरले आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघातून 30 तर शिक्षक मतदारसंघातून 17 जणांचे अर्ज बाद

पुणे पदवीधर मतदारसंघात 78 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या मतदारसंघातून 108 जणांनी पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरला होता. या अर्जाची छाननी केल्यानंतर आता 30 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत.

तर पुणे शिक्षक मतदारसंघात 50 उमेदवाराचे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यासाठी 67 जणांनी अर्ज भरला होता. यातील 17 जणांचे अर्ज बाद ठरले आहेत. यात पक्षीय आणि संघटनांचे 5 उमेदवार सोडले तर 45 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं म्हटलं जात आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर
अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर
मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5 )
मतमोजणी : 3 डिसेंबर
निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबर (Maharashtra graduate and teachers constituency election How many applications were rejected)

संबंधित बातम्या : 

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक : कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर; अभिजीत वंजारी, जयंत आसगावकरांना तिकीट