Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : आ. अमोल मिटकरींच्या गावात कोण जिंकलं?, कोण हरलं?

| Updated on: Jan 18, 2021 | 1:54 PM

आमदार मिटकरी यांच्या गावातील 13 पैकी 10 जागा राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने राखल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : आ. अमोल मिटकरींच्या गावात कोण जिंकलं?, कोण हरलं?
Follow us on

अकोला : अकोला जिल्ह्यात खासदार संजय धोत्रे यांच्या पळसोबढे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आणखी एका गावाच्या निवडणुकीची चर्चा आहे. ही निवडणूक आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा गावातील… कुटासा गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Latest News and Updates NCp Amol Kitkari kutasa Village Grampanchayat)

राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार यांच्या अकोट तालुक्यातील कुटासा येथील ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्वराज्य पॅनलचे एकून सोळा उमेदवार आपले नशिब आजमावत होते. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार आमदार मिटकरी यांच्या गावातील 13 पैकी 10 जागा राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने राखल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

कुटासा हे गाव जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांचं गाव आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, काँग्रेसनेते प्रा. उदय देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती विजयसिंह सोळंके यांचं हे गाव. या गावात वर्षाचे 365 ही दिवस राजकारण सुरुच असते.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. आता खऱ्या अर्थाने रंगत वाढली असून वेगवेगळे निकाल समोर येत आहेत.

कुटासा गावात एकूण 46 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.तर गावात इतर तीन पॅनलही रिंगणात आहे. यात काँग्रेसचा देशमुख गट आणि भाजपच्या विजयसिंह सोळंके यांची गावात युती आहे. तर वंचित बहूजन आघाडीचं स्वतंत्र पॅनल उभं आहे. सोबतच युवक काँग्रेसचा गट आणि शिवसेनेच्या संतोष जगताप यांच्या पॅनल रिंगणात आहे.

(Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Latest News and Updates NCp Amol Kitkari kutasa Village Grampanchayat)

हे ही वाचा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; चंद्रकांतदादांची पहिली प्रतिक्रिया

Gram Panchayat Election Results 2021 : पाटोद्यात आदर्श सरपंच पेरे पाटील हरले, हिवरे बाजारात पोपटराव पवार जिंकले, अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?