संजय राठोड मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईला, पूजा चव्हाण प्रकरणानंतर पहिल्यांदाच हजेरी

| Updated on: Feb 24, 2021 | 10:01 AM

दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे (Sanjay Rathod State Cabinet Meeting)

संजय राठोड मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईला, पूजा चव्हाण प्रकरणानंतर पहिल्यांदाच हजेरी
संजय राठोड सपत्नीक मुंबईला रवाना
Follow us on

यवतमाळ : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी (Pooja Chavan Case) भाष्य केल्यानंतर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) मुंबईला रवाना झाले आहेत. यवतमाळमधील निवासस्थानाहून सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ते सपत्नीक रवाना झाले. मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Minister Sanjay Rathod to attend State Cabinet Meeting in Mumbai)

संजय राठोड यवतमाळहून नागपूरच्या दिशेने रवाना झाले. सकाळी सव्वा अकरा वाजताच्या विमानाने ते मुंबईला येतील. यावेळी त्यांची पत्नी शीतल राठोड सोबत आहे. “माझं सुरळीत काम सुरु झालं आहे. माझ्या शासकीय कामांना सुरुवात करतोय. मंत्रिमंडळ बैठकीला मी रवाना होतोय” अशी माहिती राठोडांनी निवासस्थानाहून निघताना दिली. आज दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याआधीच्या बैठकीला राठोड ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात होतं.

पोहरादेवी गडावरील गर्दीवर भाष्य

“लोकांनी कोरोना संदर्भात सिरीयस झालं पाहिजे. लोकांना गांभीर्य नाहीये.” अशा शब्दात पोहरादेवी गडावर झालेल्या गर्दीमुळे दाखल गुन्ह्याविषयी संजय राठोड यांनी भाष्य केलं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विचारलं असता, “मी कालच या प्रकरणी माझी भूमिका मांडली आहे. आता मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही” असं म्हणत राठोड यांनी अधिक बोलणं टाळलं.

शरद पवारांच्या नाराजीची चर्चा

संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते. त्यावेळी समर्थकांनी पोहरादेवीवर मोठी गर्दी केली होती. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नियम पाळा असे आवाहन केले होते. तर दुसरीकडे शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

आपण जनतेसाठी एक नियम लावत असू, तर अशा पद्धतीने नेत्याच्या समर्थकांची गर्दी करु नये, असे मत शरद पवारांनी मांडल्याचे बोलले जाते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. (Maharashtra Minister Sanjay Rathod to attend State Cabinet Meeting in Mumbai)

संजय राठोड नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशांनंतर स्वत: संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. “पोहरादेवी गडावर गर्दी झाली. पण मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आली. आजूबाजूच्या शहरातील लोकं तिथं आली. मुख्यमंत्र्यांना पूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे. मी सुद्धा सर्वांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा असं सांगितलं होतं. पण दहा दिवसांनंतर मी त्यांच्यात गेलो होतो. या दहा दिवसात ज्याप्रकारे प्रसारमाध्यमं, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांच्यामध्ये प्रचार झाला होता त्यामुळे स्वत:हून लोकं त्याठिकाणी आले. गर्दीबाबत लोकांना आवाहन केलं होतं. माझं काम सुरु आहे. मी दर्शन करुन आलो आणि जिल्ह्याची आढावा बैठक घेतली”, असे संजय राठोड म्हणाले.

पूजा चव्हाणबद्दल राठोड काय म्हणाले?

पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते चुकीचं आहे, मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारं हे राजकारण आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला.

एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून झालेले आरोप आणि 15 दिवसाच्या अज्ञातवासानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मौन सोडलं. राठोड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पूजा चव्हाण प्रकरणात माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली जात आहे. पूजा चव्हाण पण आत्महत्या प्रकरणी घाणेरडं राजकारण सुरू आहे, असं सांगतानाच एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका, अशी कळकळीची विनंतीच संजय राठोड यांनी हातजोडून केली.

संबंधित बातम्या :

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात…

(Maharashtra Minister Sanjay Rathod to attend State Cabinet Meeting in Mumbai)