शिंदेंच्या मंत्र्याचं अभिजीत दीपकेच्या कुटुंबीयांशी नातं? मंत्र्यानेच दिली माहिती
राज्यातील बड्या नेत्याचे कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाशी असलेलं नातं समोर आलं आहे. स्वत: या मंत्र्याने याबाबत खुलासा केला आहे. ते ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत.

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होते. येथे जमलेल्या लाखो विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात राजकीय नेते आणि कलाकार देखील सहभागी झाले होते. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजिनामा दिला. ते पाहून विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. आता राज्यातील बड्या नेत्याचे कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाशी असलेलं नातं समोर आलं आहे. स्वत: या मंत्र्याने याबाबत खुलासा केला आहे.
कोण आहे तो बडा मंत्री?
आम्ही ज्या मंत्र्याविषयी बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणी नसून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आहे. संजय शिरसाट यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दीपकेशी असलेले नात्याबद्दल खुलासा केला आहे. काल मी अभिजीतवदिपके यांच्या कुटुंबाची भेट घेतली. अभिजीतला मी लहानपणापासून पाहिलंय. माझा मुलगा त्याच्या बहिणीच्या हातून राखी बांधतो. ते माझे मतदार.. जवळचे आहेत. नातेवाईक आहेत. त्यांची विचारपूस करणे गरजेचे वाटत होते. ते माझ्या कार्यक्रमाला येतात. मी त्यांच्या घरी पण गेलो.
कसे आहे दीपकेशी नाते?
पुढे ते म्हणाले, दीपके यांनी सांगितले की त्यांना सगळ्यांचे कॉल आले. पण मी नाही केला म्हणून तो नाराज होता. दीपकेने आंदोलन केले भावनिक झाले. त्याने नोकरी करावी सुखात रहावे असे त्याच्या आई वडिलांची इच्छा आहे. राजकारणात त्यांना नाही यायचे. काही लोक ओढून राजकारणात आणण्याचे चालले आहे. इतर लोकांना काय राजकारण करता येईल याकडे लक्ष आहे. आंदोलन झाले एकीकडे पेढे वाटतात एकीकडे असेही प्रकार पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या मातीत ताकद आहे. मराठवाड्यानेही महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि देशाचे नेतृत्व घेतले. शरद पवार पण महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी देशाचे नेतृत्व घेतले.
शेवटी संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हे डोक्यावर पडलेले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पक्ष म्हणून पाहिले. ही काय इंडिया आघाडी आहे का? राहुल गांधी एक बोलतात बाकी दुसरीकडे जातात. संजय राऊत स्वतःच्या पक्षाला हायलाईट करतात. उध्दव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा. इडा पिडा दूर जावे आणि संजय पिडा पण दूर जावो. युपी मध्ये पैदा झाले आणि महाराष्ट्रात पेढे वाटतात असे दिसून येत आहे.