AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगली जिल्ह्याला पुराचा फटका, पण सुदैवाने 2019 सारखी परिस्थिती नाही, प्रशासनाचं चांगलं काम : विश्वजीत कदम

सांगलीला पुराचा फटका आहे. पण 2019 सारखी स्थिती नाहीय. प्रशासनाने अगोदरच तयारी केली होती. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

सांगली जिल्ह्याला पुराचा फटका, पण सुदैवाने 2019 सारखी परिस्थिती नाही, प्रशासनाचं चांगलं काम : विश्वजीत कदम
विश्वजीत कदम
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 12:42 PM
Share

सांगली : सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसलेला आहे मात्र 2019 ला जी परिस्थिती निर्माण झाली होती तशी काही भागात दिसत नाहीये हे चांगलं आहे. प्रशासनाने आधीपासून खबरदारी घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं होतं, असं म्हणत मंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी प्रशासनाला शाबासकी दिली आहे.

सांगलीला पुराचा फटका, सुदैवाने  2019 सारखी स्थिती नाहीय

सांगलीला पुराचा फटका बसला आहे. पण 2019 सारखी स्थिती नाहीय. प्रशासनाने अगोदरच तयारी केली होती. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. त्यांची जेवणाची आणि इतर गोष्टीची सोय करण्याचही काम सुरू आहे, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

प्रशासन घटनास्थळी पोहोचलंय, बचाव कार्य सुरु

महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडल्याने तीन ते चार दुर्घटना घडल्या. या दुर्घटनेत जवळपास 80 ते 90 लोकांचा मृत्यू झाला. या सगळ्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. सगळीकडेच जोरदार पाऊस सुरु असल्याने त्यामुळे या दुर्घटना घडल्यात.. लोकांसाठी जे जे चांगलं करता येईन ते करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारच्या वतीने घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे, असंही विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

सांगली कोल्हापूरची पूरस्थिती आटोक्यात

सांगली कोल्हापूरची पूरस्थिती आटोक्यात येतीय. आता धोका कमी होतोय. परिस्थिती आटोक्यात येतीय. लोकांना खूप चांगल्या प्रकारे रेस्क्यू करण्यात यश आलं. कोकणवासियांना मोठा फटका बसला. कोकणी बांधवांना आधार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

सांगली कोल्हापुरात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम

मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे आवक खंडित होण्याची भीती आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण येथे आलेल्या पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलन आणि वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. दूध विक्रेत्यांकडे एका दिवसाचा दुधाचा साठा असला तरी पूरस्थिती, पाऊस कायम राहिल्यास आणि वाहतूक पूर्वपदावर न आल्यास दूधाचा पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघ आणि गुजरातमधील अमूलकडून साधारण 22 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. शिवाय सांगली-सातारा येथून इतरही काही दूध संघांकडून मुंबईला दूध पुरवठा होतो. सध्या कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पूरस्थिती गंभीर असून अनेक महामार्ग, रस्ते बंद आहेत. या भागांतील गोठ्यांवरही पूराचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गोकुळच्या दूध संकलनात काहीशी घट झाली आहे.

(Maharashtra Minister Vishwajeet kadam on Sangali Flood)

हे ही वाचा :

Ambeghar landslide : 35 तासांनी दोन म्हशी बाहेर, यंत्रणा पोहोचणं अशक्य, टीव्ही 9 चा प्रतिनिधी 4 तास चालत आंबेघरमध्ये

Rescue work : महाराष्ट्र ते गोवा… पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन, एनडीआरफ, लष्कर आणि नेव्ही ऑन दी स्पॉट

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.