NMMC Election 2022, Ward 31 : बदललेल्या राजकीय समीकरणाचा शिवसेनेला फटका बसणार? जाणून घ्या प्रभागाची राजकीय व भौगोलिक परिस्थिती

| Updated on: Aug 21, 2022 | 2:11 AM

मुंबईपाठोपाठ आर्थिकदृष्ट्या चांगली प्रगती साधत असलेल्या नवी मुंबई महापालिकेवर यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारतेय, महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती येताहेत, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

NMMC Election 2022, Ward 31 : बदललेल्या राजकीय समीकरणाचा शिवसेनेला फटका बसणार? जाणून घ्या प्रभागाची राजकीय व भौगोलिक परिस्थिती
नवी मुंबई महापालिका निवडणूक
Follow us on

नवी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर शिवसेनेपुढे बरीच आव्हाने उभी ठाकली आहेत. ठाणे, नवी मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिला आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या 67 पैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेतील 46 पैकी शिवसेनेचे 32 नगरसेवकही एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. या सगळया बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यंदा होणारी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक (Navi Mumbai Municipal Corporation Election) अत्यंत चुरशीची होणार आहे. सध्या भाजपचे वर्चस्व असलेल्या या महापालिकेत मूळ शिवसेनेपुढे एकनाथ शिंदे गटाचेच मोठे आव्हान असेल. त्यात एकनाथ शिंदे यांना भाजपकडून पाठिंबा मिळणार असल्यामुळे या दोघांच्या युतीपुढे उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांची रणनीती किती प्रभावी ठरतेय, त्यावर नवी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. नवी मुंबईत अलीकडे मनसेनेही बरेच नागरी प्रश्न उचलून धरले आणि त्यावर आंदोलन करून आवाज उठवला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचाही आधीपासूनच दबदबा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये नेमके कोण बाजी मारेल याचा अंदाज लावणे सध्यातरी कठीण बनले आहे.

नवी मुंबई महापालिका वॉर्ड 31 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 31 ची लोकसंख्या

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 साठी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत गेल्या सहा वर्षांत केवळ 30,000 मतदारांचीच भर पडली आहे. नव्या मतदार यादीनुसार, शहरात 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 8,15,067 मतदार होते. ती संख्या आता 8,45,524 वर गेली आहे. लोकसंख्येनुसार महापालिकेच्या वॉर्डची संख्या 111 वरून 122 करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 31 ची लोकसंख्या 30623 इतकी आहे. या लोकसंख्येकडून कोणाला कौल दिला जातोय, यावर महापालिकेतील सत्तेची गोळाबेरीज अवलंबून असणार आहे.

नवी मुंबई महापालिका वॉर्ड 31 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 31 मध्ये अंतर्भूत विभाग कोणकोणते?

झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 चा मोठा विस्तार झाला आहे. या प्रभागामध्ये नेरुळ सेक्टर 2, नेरुळ सेक्टर-4, सानपाडा सेक्टर-21, सानपाडा सेक्टर-22, सानपाडा सेक्टर-23 जीईएस, सानपाडा सेक्टर-24, सानपाडा सेक्टर-25, चिंचोली तलाव, जुईपाडा गाव व इतर या प्रमुख विभागांचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा

महापालिकेतील आरक्षण सोडतीनंतरची स्थिती

एकूण नगरसेवक संख्या : 122
प्रभाग संख्या : 41
दोनचे पॅनल : 01
तीनचे पॅनल : 40
अनुसूचित जाती : 11 जागा
अनुसूचित जमाती : 02 जागा
सर्वसाधारण : 109 जागा

नवी मुंबई महापालिका वॉर्ड 31 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

महिलांसाठी आरक्षित जागा : 61

अनुसूचित जाती : 06
अनुसूचित जमाती : 01
सर्वसाधारण : 54

मुंबईपाठोपाठ आर्थिकदृष्ट्या चांगली प्रगती साधत असलेल्या नवी मुंबई महापालिकेवर यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारतेय, महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती येताहेत, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.