Maharashtra Political Crisis : राजकीय अस्थिरतेचा गोंधळ आणखी आठ दिवस?; नव्या सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त जुलैचा?

| Updated on: Jun 25, 2022 | 2:08 PM

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 21 जून रोजी बंड केलं. शिंदे आधी आमदारांना घेऊन सुरतला गेले. सुरतला त्यांनी एक दिवस मुक्काम केला. सुरत मुक्कामी असतानाच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं थेट शिवसेना पक्षप्रमुखांशीच फोनवरून बोलणं करून दिलं.

Maharashtra Political Crisis : राजकीय अस्थिरतेचा गोंधळ आणखी आठ दिवस?; नव्या सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त जुलैचा?
राजकीय अस्थिरतेचा गोंधळ आणखी आठ दिवस?; नव्या सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त जुलैचा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे (shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. मंगळवारपासून सुरू असलेला हा राजकीय अस्थिरतेचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. पुढच्या आठवड्यातही हा गोंधळ तसाच राहणार असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं. तसेच एकनाथ शिंदे हे पुढच्या आठवड्यातच राज्यात सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका राष्ट्रीय पक्षाकडून ऑफर येणार असल्याचं शिंदे गेल्या दोन दिवसांपासून आमदारांना सांगत आहेत. पण अजूनही या राष्ट्रीय पक्षाकडून (national party) शिंदे यांना कोणती ऑफर आली नाही. ही ऑफर एक दोन दिवसात येईल. त्यानंतर आमदारांशी चर्चा केल्यानंतर 3 जुलैच्या आसपास राज्यात नवं सरकार येईल, असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे गुवाहाटीतील सर्व राजकीय घडामोडींकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 21 जून रोजी बंड केलं. शिंदे आधी आमदारांना घेऊन सुरतला गेले. सुरतला त्यांनी एक दिवस मुक्काम केला. सुरत मुक्कामी असतानाच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं थेट शिवसेना पक्षप्रमुखांशीच फोनवरून बोलणं करून दिलं. पण सूर जुळले नाही. त्यानंतर शिंदे यांनी आमदारांना घेऊन आसामकडे कूच केली. गुवाहाटीत हे आमदार पोहोचले. त्यानंतर त्यांच्यासोबत न आलेल्या एका एका आमदारांनीही गुवाहाटी गाठली. त्यामुळे शिंदे यांचं बळ वाढलं.

हे सुद्धा वाचा

पाच दिवस झाले निर्णय नाही

दरम्यान, शिंदे यांच्या बंडाला आज पाच दिवस झाले आहेत. पाच दिवसात सुरत आणि गुवाहाटी असा त्यांनी प्रवास केला. आमदारांचं संख्याबळ त्यांच्याकडे जमा झालंय. पण अजूनही त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. शिवाय कोणत्याही राष्ट्रीय पक्षाकडून त्यांना अजूनही कसलीही ऑफर आली नाही. शिंदेंनीही कोणत्याही पक्षाला किंवा भाजपला कसलाही प्रस्ताव दिला नाही. फक्त मिटिंगा घेण्यात आल्या. गटनेता, प्रतोद निवडण्यात आले. शिवसेनेकडून होणाऱ्या आरोपांना ट्विट करून उत्तरे देण्यात आली.

फॉर्म्युला आधीच ठरला?

याच काळात शिंदे समर्थक आमदार शहाजी बापू पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी शिंदे-फडणवीसांचा प्लानच सादर केला आहे. फडणवीस- शिंदे यांची युती होणार आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. शिंदे यांना चांगली आणि ज्यादा खाती दिली जाणार असल्याचं पाटील या कथित ऑडिओ क्लिपमध्या सांगताना दिसत आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांमध्ये सत्तेचा फॉर्म्युला आधीच झाल्याचं सांगितलं जात आहे. हा फॉर्म्युला ठरल्यानंतरच शिंदे यांनी बंड केलं असावं असं सांगितलं जात आहे.

मग उशीर का?

सत्तेच फॉर्म्युला आधीच ठरलाय तर मग सरकार स्थापन करण्यात उशीर का होत आहे? असा सवाल केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण केलेल्या बंडाबाबत काय राजकीय प्रतिक्रिया उमटतात, शिवसैनिक कसे रिअॅक्ट होतात आणि आपल्यासोबत ग्रासरूटवर कोण कोण असतील याची चाचपणी करण्यासाठी शिंदे वेळ काढत आहेत. तसेच लोकांमधील राग शांत करण्यासाठीही शिंदे वेळ काढत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

3 जुलै रोजी नवं सरकार?

दरम्यान, येत्या 3 जुलै रोजी राज्यात नवं सरकार येणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे अजून एक आठवडा वेळ काढतील. सर्व तयारी होईल. तोपर्यंत राज्यपालही सक्रिय होतील. नंतरच राज्यात शिंदे-फडणवीसांचं नवं सरकार येईल, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सत्तेसाठी 3 जुलैचा मुहूर्त साधतात की त्याआधीच राज्याची सूत्रे हाती घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.