Eknath Shinde : राष्ट्रवादीने हातआखडता घेतला, तर भाजपने निधीवर डल्लाच मारला; शिंदे गटाच्या मंत्र्यांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’

| Updated on: Aug 17, 2022 | 5:24 PM

Eknath Shinde : या सर्व प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुरवणी मागण्यामध्ये जो निधी मिळला आहे तो त्या त्या विभागला आवश्यकतेनुसार मिळाला आहे. त्यात शिंदे गट असला काही प्रकार नाही.

Eknath Shinde : राष्ट्रवादीने हातआखडता घेतला, तर भाजपने निधीवर डल्लाच मारला; शिंदे गटाच्या मंत्र्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार
राष्ट्रवादीने हातआखडता घेतला, तर भाजपने निधीवर डल्लाच मारला; शिंदे गटाच्या मंत्र्यांना 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार'
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीकडून (ncp) निधी देण्यात दुजाभाव केला जात आहे. राष्ट्रवादीने स्वत:ला अधिक निधी घेतला. त्यानंतर काँग्रेसला सर्वाधिक निधी दिला. पण शिवसेनेला कमी निधी दिला. आम्ही मतदारसंघात कामं कशी करायची? असा सवाल करत शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केलं. त्यानंतर या आमदारांनी भाजपशी (bjp) हात मिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. सत्तेत शिंदे गटाकडे (cm eknath shinde) मुख्यमंत्रीपद आलं. पण त्या बदल्यात भाजपने महत्त्वाची खाती घेतली. तसेच शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती दिली. त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरलेली असतानाच आता शिंदे गटाला निधी कमी दिल्याचं समोर आलं आहे. भाजपने सर्वाधिक निधी घेतला असून शिंदे गटाच्या मंत्र्यांना कमी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था झाली आहे.

भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यांना 11 हजार 800 कोटींची निधी देण्यात आला आहे. तर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यांना 6 हजार 303 कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यांना कमी निधी मिळाल्याने विरोधकांनी आणि खासकरून शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. पूर्वी अजित पवारांच्याकडे अर्थ खातं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खातं आहे. त्यामुळे शिंदे गट कुणाकडे तक्रार करणार? असा सवाल केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

दूध का दूध, पानी का पानी दिसतंय

कागदावर निधी दिसतोच आहे. दूध का दूध पानी का पानी दिसत आहे. तिकडे गेल्यावर जास्त निधी मिळणार असं त्यांना वाटत होतं. आता त्यांनीच पाहावं, असा टोला शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी लगावला आहे.

ये तो हो ना ही था

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपातील दुजाभावावरून शिंदे गटाला चांगलेच डिवचले आहे. मला आश्चर्य वाटत नाही. हे होणारच होतं. ते होणारच होतं. ये तो हो ना ही था, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला डिवचले आहे.

आता तशी परिस्थिती नाही

या सर्व प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुरवणी मागण्यामध्ये जो निधी मिळला आहे तो त्या त्या विभागला आवश्यकतेनुसार मिळाला आहे. त्यात शिंदे गट असला काही प्रकार नाही. डिसेंबरमध्ये नागपूर अधिवेशनात पुन्हा पुरवणी मागण्या येणार आहेत.मागच्या काळात कमी निधी मिळत होता ही वस्तुस्थिती आहे. पण आता तशी परिस्थिती नाही, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे.