12 विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट, भाजप-सेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी निश्चित, महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्रीपदं?

| Updated on: Oct 26, 2019 | 11:14 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर भाजपला फिप्टी फिप्टी फॉर्म्युल्याची (Maharashtra probable Ministry) आठवण करुन दिली. Maharashtra probable Ministry, two deputy CM may in maharashtra, aaditya thackeray

12 विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट, भाजप-सेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी निश्चित, महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्रीपदं?
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या (Maharashtra probable Ministry) हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर भाजपला फिप्टी फिप्टी फॉर्म्युल्याची (Maharashtra probable Ministry) आठवण करुन दिली. ही आठवण करुन देण्यामागं, मुख्यमंत्रीपद हेच एकमेव कारण आहे. मात्र जर मुख्यमंत्र्यांपदावरुनही (two deputy CM in Maharashtra) जडजोड झालीच तर उपमुख्यमंत्रीपद (two deputy CM in Maharashtra) तर नक्कीच मिळू शकतं.

फिफ्टी फिफ्टी फॉर्मुला सांगून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरही (Uddhav Thackeray) दावा केलाच आहे. मात्र जर मुख्यमंत्रीपद सेनेला मिळालंच नाही, तर उपमुख्यमंत्रीपद शिवसेना मिळवल्याशिवाय राहणार नाही.  शिवसेनेचा जर उपमुख्यमंत्री झाला, तर भाजपकडूनही आणखी उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकते. म्हणजेच आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद आणि भाजपकडून चंद्रकांत पाटलांनीही उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते.

या निवडणुकीची आणखी एक गंमत म्हणजे भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, एकनाथ खडसेंचा आधीच पत्ता कट केला. तर पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, राम शिंदे, संजय भेगडे, विजय शिवतारे, परिणय फुके, अर्जुन खोतकर आणि अनिल बोंडे या 8 मंत्र्यांचा पराभव झाला.

म्हणजेच मंत्रिमंडळात एकूण 12 चेहरे नव्यानं लागतील. त्यामुळं नव्या चेहऱ्यांना यावेळी संधी मिळू शकते.

भाजपकडून नेमके कोण मंत्री होऊ शकतात?

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयकुमार रावल, संजय कुटे, योगेश सागर, मंगल प्रभात लोढा, गणेश नाईक, नितेश राणे, अभिमन्यू पवार, सीमा हिरे, जयकुमार गोरे, लक्ष्मण जगताप, सुरेश खाडे यांना संधी मिळू शकते.

शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपद?

आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, संजय राठोड, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, सुनिल प्रभू, मनिषा कायंदे, राहुल पाटील, उदय सामंत किंवा भास्कर जाधव, यांना मंत्रिपदं मिळू शकतात.

मंत्रिमंडळातील समान वाट्याबरोबरच शिवसेनेची नजर यावेळी महत्वाच्या खात्यांवरही असेल. त्यापैकीच एक गृहखातं सुद्धा आहे. मात्र महत्वाची डील तर आता फिफ्टी फिफ्टीवरच अडून बसली आहे.