“गद्दारांना गाडण्यासाठी निष्ठावंत तय्यार!”, महाविकास आघाडीकडून ‘महामोर्चा’ची झलक दाखवणारे व्हीडिओ शेअर

'महामोर्चा'ची झलक दाखवणारे व्हीडिओ, पाहा...

गद्दारांना गाडण्यासाठी निष्ठावंत तय्यार!, महाविकास आघाडीकडून महामोर्चाची झलक दाखवणारे व्हीडिओ शेअर
| Updated on: Dec 17, 2022 | 11:30 AM

मुंबई : राज्यातील सरकार आणि विरोधकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधक एकाच दिवशी एकमेकांविरोधात आंदोलन करणार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने ‘महामोर्चा’ (Mahamorcha) तर भाजपच्या वतीने ‘माफी मांगो’ (Mafi Mango) आंदोलन करण्यात येतंय. मविआने सरकार विरोधात काढलेला ‘महामोर्चा’ कसा असणार आहे याची झलक दाखवणारे व्हीडिओ महाविकास आघाडीच्या वतीने शेअर करण्यात आले आहेत.

ठाकरेगटाचं ट्विट

“गद्दारांना गाडण्यासाठी निष्ठावंत तय्यार!”, असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यात महामोर्चासाठी निघालेले शिवसैनिक दिसत आहेत. महामोर्चाच्या पूर्वी तयारीचा व्हीडिओ ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या ठाकरेगटाकडून शेअर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीकडून व्हीडिओ शेअर

राष्ट्रवादीच्या वतीनेही महाविकास आघाडीच्या या महामोर्चाविषयी ट्विट करण्यात आलं आहे.”महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यातून त्यांचा केलेला अवमान, बेरोजगारी अशा असंख्य गोष्टींचा जाब या राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल’ हा मोर्चा पुकारण्यात आला आहे”, असं म्हणत राष्ट्रवादीने हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.

काँग्रेसचं ट्विट

महाराष्ट्र आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हल्लाबोल महामोर्चा. आपणही जरुर सहभागी व्हा!, असं ट्विट काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं आहे.

‘महामोर्चा’

महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेन. महाविकास आघाडीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.