AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसकडून माणिकराव ठाकरेंना उमेदवारी?

वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वातावरण हळूहळू तापू लागलंय. या मतदारसंघात बंजारा, मुस्लीम, मराठा, आदिवासी या जातींचं समीकरण आहे. बंजारा समाजातील राजकारण आणि विरोधात दमदार मराठा उमेदवार न मिळाल्याने आतापर्यंत या मतदारसंघावर गवळी कुटुंबाचे वर्चस्व राहिले. शिवसेनेच्या भावना गवळी या सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु यंदाही जातीचे योग्य समीकरण जुळविणाऱ्याच्या पारड्यात […]

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसकडून माणिकराव ठाकरेंना उमेदवारी?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वातावरण हळूहळू तापू लागलंय. या मतदारसंघात बंजारा, मुस्लीम, मराठा, आदिवासी या जातींचं समीकरण आहे. बंजारा समाजातील राजकारण आणि विरोधात दमदार मराठा उमेदवार न मिळाल्याने आतापर्यंत या मतदारसंघावर गवळी कुटुंबाचे वर्चस्व राहिले. शिवसेनेच्या भावना गवळी या सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु यंदाही जातीचे योग्य समीकरण जुळविणाऱ्याच्या पारड्यात मतदार कौल टाकतील अशी स्थिती आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात लढतीचे चित्र आहे. असे असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काहींचे समीकरण बदलणार यात शंका नाही. अनेक वर्षे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत शिवसेनेचा गड केला आहे. आगामी निवडणुकीतही काँग्रेस-शिवसेना असाच सामना रंगणार आहे.

भावना गवळींविरोधात काँग्रेसकडून विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघांत गेल्या एका वर्षांपासून गावागावात भेटीगाठी, भूमीपूजनाच्या निमित्ताने त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मतदारसंघात जनसंपर्कही वाढविला आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाचे प्रा. प्रवीण पवार यांना उमेदवारी जाहीर करून तगडे आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेला आव्हान असेल यात मात्र शंका नाही.

वाशिम जिल्हा हा वाशिम-यवतमाळ आणि अकोला अशा दोन लोकसभा मतदारसंघात विभागला आहे. जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव दोन तालुके अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असून वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा असे चार तालुके हे वाशिम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.

वाशिम आणि यवतमाळमधील काही विधानसभा मतदारसंघ मिळून यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दारव्हा, यवतमाळ, राळेगाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Follow Us
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा