“मला अटक करण्याची तयारी सुरुये”, सीबीआय चौकशीआधी मनीष सिसोदिया यांचा आरोप

| Updated on: Oct 17, 2022 | 11:41 AM

मनीष सिसोदिया यांची आज सीबीआय चौकशी होतेय. याआधी त्यांनी तीन ट्विट करत त्यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय.

मला अटक करण्याची तयारी सुरुये, सीबीआय चौकशीआधी मनीष सिसोदिया यांचा आरोप
Follow us on

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची आज सीबीआय चौकशी होतेय. मद्य घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. याआधी त्यांनी तीन ट्विट करत त्यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय.”मला अटक करण्याची तयारी सुरु आहे”, असा आरोप सिसोदिया (Manish Sisodia CBI Inquiry) यांनी केला आहे.

चौकशीला जाण्याआधी सिसोदिया यांनी राजघाटवर जात महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

माझ्या विरोधात खोटी केस उभी करून मला अटक करण्याचा यांचा मानस आहे. येत्या गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचारासाठी मी जाणार होतो. मोदींना त्यांचा पराभव समोर दिसतोय.त्यामुळे गुजरातला जाण्यापासून मला रोखलं जातंय, असा आरोप सिसोदियांनी केला आहे.

माझ्या विरोधात एक खोटी केस उभी केली आहे. माझ्या घरी छापेमारी केली. बँकेत चौकशी केली. माझ्या गावी जाऊन चौकशी केली. पण त्यांना काहीही सापडलं नाही. माझ्या विरोधात उभी केलेली केस पूर्णपणे खोटी आहे, असं सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

जरी या लोकांनी मला अटक केली. तरी त्यांचा पराभव निश्चित आहे.आप पक्ष आपला प्रचार जोमाने करेन. आम्ही चांगली शाळा, दवाखाने, नोकरी, वीज या सारख्या लोकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या विकासाच्या मुद्द्यावर लोकांना मतं मागतोय. गुजरातची निवडणूक एक मोठं आंदोलन असेल, असं ट्विट सिसोदिया यांनी केलं आहे.