Manoj Jarange Patil: 10 मिनिटात फोन नाही आला तर परभणीला जाणार; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे संतापले आहेत. त्यांनी बंडू जाधव माझा दम बघू नकोस तू असे म्हटले आहे.

आज परभणी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे आयोजन शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय जाधव यांनी केले आहे. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी बंडू जाधन यांना फोन करुन हा मेळावा रद्द करावा असे स्पष्ट शब्दात सांगितले. तसेच हा कार्यक्रम रद्द केला नाही तर मी तिथे येईन असे म्हटले. आता मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना जर दहा मिनिटात मला फोन आला नाही तर मी परभणीला जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी नुकताच माध्यमांशी बोलताना, एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला येवू नये. मी कधी चाल करून गेलो नाही. कार्यक्रमात घुसेल. राज्य अस्थिर होईल. बंडू जाधव तुझ्यामुळे हे सर्व होईल. काय शेतकऱ्यांना देणार आहेत तुम्ही. इकडे निवडून आले तिकडे गेले. याच भाषेत बोलणार मी. बंडू जाधव माझा दम बघू नकोस तू. संजय शिरसाट याने वाटोळं केल आहे सगळं. आमच्या उरावर नाचवतो. मराठ्यांच्या उरावर नाचायला सांगितला का? मी पुन्हा तिकडे जाईल. १० मिनिटाचा वेळ आहे त्यांना नाहीतर धिंगाणा होईल असे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक येऊ लागले आहेत. मुंबईत आंदोलनाची परवानगी न मिळाल्यानंतर जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली.
परभणी पोलीस अलर्ट मोडवर
मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत होणारा शेतकरी मेळावा रद्द करा अशी धमकी दिल्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर गेले आहेत. खासदार संजय जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.