मराठा आरक्षण LIVE : आरक्षण विधेयक मंजूर, राज्यपालांकडे पाठवणार

मराठा आरक्षण LIVE : आरक्षण विधेयक मंजूर, राज्यपालांकडे पाठवणार

मुंबई : मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभा आणि विधान परिषद अशा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं. दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक मांडल्यानंतर, या विधेयकाला सर्व विरोधकांनीही पूर्ण पाठिंबा दिला. विधेयकाला मंजुरी मिळाल्याने आता हे विधेयक राज्यपालांकडे पाठवले जाणार असून, त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

 L I V E    U P D A T E  :

 • मराठा आरक्षणानंतर आता धनगंर समाज आक्रमक,उद्याच्या उद्या जीआर काढण्याची मागणी, धनगर आणि धनगड यात फरक नसल्याचा जीआर काढा, धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप, याच अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा येणार होता, मात्र उद्या शेवटचा दिवस आहे.
  राज्यात धनगर समाजाची किमान दीड कोटी जनता, उद्याच्या उद्या आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याची धमकी

माजी महाधिवक्ते श्रीहरि अणे यांची प्रतिक्रिया

– हे आरक्षण कोर्टात चॅलेंज होणार असं दिसतंय, या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. आरक्षणातून कठीण परिस्थिती निर्माण होईल. स
– ओबीसी क्लासच्या बाहेरुन आरक्षण देणे हे घटनाविरोधी, हे कोर्टात टिकणं अवघड
– मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागेल
– कॅव्हेट दाखल करुन फारसा फरक पडणार नाही, कोर्ट कधीच एकतर्फी निर्णय देत नाही
– नारायण राणे यांच्या कमिटीने सर्वांगीण विचार करुन आरक्षण दिलं नव्हतं असं म्हणता येईल
– हे आरक्षण कोर्टात टिकवणं हे सरकारपुढे सगळ्यात मोठं आव्हान

 • मंत्रिमंडाळाची बैठकीत मराठा आऱक्षणाचा विधेयकाला मंजुरी, राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी विधेयक पाठवणार

पुणे – पुरुषोत्तम खेडेकर, अध्यक्ष, मराठा सेवा संघ यांची प्रतिक्रिया
“सरकारने आज दिलेले आरक्षण घटनात्मक टिकणारे नाही, जुनी दारू नवा ब्रँड असा प्रकार आहे, सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली, घटनादुरुस्ती केली तर आम्ही स्वागत करू, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या” –

 • मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं, भाजपकडून जल्लोष करण्यात आला. पण मराठा क्रांती मोर्चाने मात्र कोणताही जल्लोष केला नाही. मराठा बांधवांनी मोर्चादरम्यान काळात ज्यांनी प्राणाची आहुती दिली, यांना पणत्या लावून श्रद्धांजली वाहिली. हे मिळालेल सर्व श्रेय आत्महत्या केलेल्या बांधवांच आहे
 • नोकरभरती लवकरात लवकर सुरु करा आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत द्या – अजित पवार
 • अजित पवार यांनी आझाद मैदानात जाऊन ओबीसी आणि मराठा समाजातील आंदोलकांची भेट घेतली
 • मराठा समाजाचं आरक्षण विधेयक सभागृहात मंजूर, सर्व विरोधी पक्षांचा एकमताने पाठिंबा
 • मराठा समाजाचं आरक्षण विधेयक मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मांडलं
 • विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे
  – मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर
  – राज्यभरात एकूण 32.14 टक्के मराठा समाज
  – शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये 6 टक्के प्रतिनिधित्त्व
  – 73.86 टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून
  – ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही

 • एटीआर सादर, मराठा समाजाला 16 आरक्षणाची तरतूद
 • मुख्यमंत्री सभागृहात दाखल, कुठल्याही क्षणी एटीआर मांडला जाईल
 • मराठा आरक्षण : अक्शन टेकन रिपोर्ट म्हणजेच ATR मध्ये काय आहे?
  – आज विधिमंडळात सादर केला जाणार
  – मराठा समाजाला आरक्षण देणार
  – मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत 16% आरक्षण देणार
  – आरक्षण देण्यासाठी विधान सभा आणि विधान परिषदेत विधेयक मांडणार
  – विधेयक एकमताने मंजूर करुन घेणार
  – मूळ 52 % आरक्षणाला धक्का लागू न देता आर्थिक आणि सामाजिक मगासलेला वर्ग या प्रवर्गात आरक्षणा देणार
  – शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणार
 • मराठा समाजाच्या आरक्षणच्या टक्केवारीवरुन मी नाराज नाही, उपसमितीची मी सदस्य नाही, नाराज असल्याच्या केवळ अफवा – पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण
 • ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा कोर्टात जाऊ – ओबीसी नेत्यांचा इशारा
 • ठाणे – मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना नवघर पोलिसांकडून ताब्यात, आज आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास विधिमंडळात शिरण्याचा दिलेला इशारा
 • मराठा समाजाला आज न्याय मिळेल, 52% आरक्षणाला धक्का लागू न देता आरक्षण देणार, विधेयकसुद्धा आज मांडणार, शिवसेना-भाजप एकत्र जल्लोष करणार – एकनाथ शिंदे
 • गरज पडल्यास विधेयकासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवणार – चंद्रकात पाटील
 • अजितदादा, तुमच्याकडून खूप राजकारण शिकलोय, त्यामुळे आमच्याकडून काहीच चूक होणार नाही – चंद्रकांत पाटील
 • मुंबई आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक सुरु
 • मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपली, मराठा आरक्षणाची टक्केवारी ठरली, बैठकीच्या निर्णयावर पंकजा मुंडे नाराज
 • मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपली, मराठा आरक्षणाची टक्केवारी ठरली, बैठकीच्या निर्णयावर पंकजा मुंडे नाराज, पंकजा मुंडे बैठकीतून बाहेर पडल्याची सूत्रांची माहिती
 • मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपली, मराठा आरक्षणाची टक्केवारी ठरली, बैठकीच्या निर्णयावर पंकजा मुंडे नाराज
 • मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपली, आरक्षणाच्या टक्केवारीवर चर्चा
 • मराठा समाजाच्या संघर्षाचं रुपांतर कायद्यात होऊन आरक्षण मिळायला हवं, सर्व पक्ष पाठिंबा देतील – जयंत पाटील
 • मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर होताच भाजपचे सर्व आमदार भगवे फेटे परिधान करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार, विधानभवन परिसरात जल्लोष फेरी काढणार आणि मिठाई वाटणार
 • मराठा समाजाला किती आरक्षण द्यायचे यावर अद्याप एकमत नाही, 10 टक्के की 16 टक्के यावर एकमत नाही, मुख्यमंत्रीच घेणार अंतिम निर्णय
 • मराठा आरक्षणाची टक्केवारी समाधानकारक असेल, कुणीही नाराज होणार नाही, आजच दोन्ही सभागृहांमध्ये एटीआर आणि विधेयक मांडले जाईल – गिरीश महाजन
 • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार श्रेयवादाच्या लढाईत अडकून पडलंय, सर्वांना सोबत घेऊन मराठा आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा आणि घोषणा करावी – खासदार राजू शेट्टी
 • मुख्यंमत्र्यांनी आरक्षणासाठी दिलेले आश्वासन पाळले – शिक्षणमंत्री विनोद तावडे
 • दुपारी 12 वाजता अॅक्शन टेकन रिपोर्ट (एटीआर), तर दुपारी 1 वाजता विधेयक मांडणार – शिक्षणमंत्री विनोद तावडे
 • मराठा आरक्षणावरील विधेयक आज मांडलं जाईल, चर्चेसाठी पुरेसा वेळ दिला जाईल – संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट
 • विधानपरिषदेतही मराठा आरक्षणासंदर्भातील अॅक्शन टेकन रिपोर्ट (ATR) मांडलं जाणार
 • मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा कृती अहवाल विधानसभेत सकाळी 11.30 पर्यंत मुख्यमंत्री मांडतील, विधानसभेच्या कामकाजात एटीआरचा उल्लेख, आरक्षणाच्या विधेयकाचा मात्र उल्लेख नाही
 • मराठा आरक्षणाचा जल्लोष करण्याची भाजपची तयारी, अभिनंदनाचे बॅनर्स लावण्याचे भाजप कार्यालयातून कार्यकर्त्यांना आदेश
 • मुंबईत आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा आक्रोश मोर्चा
 • सकाळी 10.30 वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची मराठा आरक्षणावर बैठक, आरक्षणाची टक्केवारी बैठकीत ठरवली जाणार

आरक्षणाची टक्केवारी ठरवण्यासाठी उपसमितीची बैठक

मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आलं असताना, आज सकाळी 10.30 वाजता मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. त्यात आरक्षणाची टक्केवारी ठरवली जाणार आहे. बैठकीनंतर एटीआर मांडलं जाणार आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

उपसमितीत कोण कोण आहे?

मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे या उपसमितीचे सदस्य आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सह सदस्य आहेत.

समितीकडे अधिकार काय?

कॅबिनेटने मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशी 18 नोव्हेंबरला स्वीकारल्या. त्यानंतर मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली होती. आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही करण्याचा अधिकार मंत्रीमंडळ समितीला देण्यात आला आहे आणि याच समितीचा निर्णय अंतिम असेल. विचारविनिमयासाठी गरजेनुसार तज्ञ, विधिज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत.

शिवसेना-भाजपच्या आमदारांना व्हीप जारी

मराठा आरक्षण विधेयक सभागृहात आणण्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलाय. बहुमताने विधेयक पास व्हावं आणि विरोधकांच्या विरोधाचा सामना ताकदीने करता यावा यासाठी सरकारने आतापासूनच योजना आखली आहे. विधेयक 29 आणि 30 तारखेला अनुक्रमे दोन्ही सभागृहात मंजूर केलं जाईल आणि त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने त्याचं कायद्यात रुपांतर होईल. सर्व आमदार सभागृहात उपस्थित असावेत यासाठी शिवसेना-भाजपने आपापल्या आमदारांना पुढील तीन दिवस अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत व्हीप जारी केलाय.

मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळू शकतं?

मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळामध्ये अपेक्षित आहे. हे विधेयक कसे असेल याची अजून निश्चिती झाली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा मागास असल्याचे मान्य करत त्यांना आरक्षण देण्यात येईल. मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याची शिफारस विधेयकात असेल. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये हे 16 % आरक्षण असेल. राज्य सरकारच्या अधिकारातील घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) च्या आधारे मराठा समाजाला आरक्षण पुरवले जाईल. मराठ्यांना मिळणारे आरक्षण हे राजकीय क्षेत्रातले नाही. त्यामुळे पंचायत राज कायद्यानुसारच्या आरक्षणाचा त्यात समावेश नसेल.

मराठा आरक्षणाचं विधेयक कसं असेल?

– मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा मागास असल्याचे मान्य केले जाईल
– मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याची शिफारस विधेयकात असेल
– शिक्षण आणि नोक-यांमध्ये हे 16 % आरक्षण असेल
– राज्य सरकारच्या अधिकारातील घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) च्या आधारे आरक्षण
– मराठ्यांना मिळणारे आरक्षण राजकीय नाही, त्यामुळं पंचायत राज कायद्याशी संबंध नसेल

आरक्षण कोर्टात टिकेल?

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यावर जवळपास एकमत झाल्याचं दिसत असलं तरी ते आरक्षण कोर्टात टिकेल का यावर प्रश्न चिन्ह असल्याचं कायद्यांचे जाणकार सांगतात. समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावर जर हे आरक्षण दिलं जात असेल तर त्याला कोर्टामध्ये आवाहन केलं जाऊ शकतं तसंच त्यावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जाऊ शकतं. आरक्षण घटनेत बसवण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागू शकतात अस मत कायद्यांचे जाणकार व्यक्त करतात.

आरक्षण कोर्टात टीकेल!

मराठा आरक्षण देताना मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिल्यामुळे आरक्षण टिकण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील एओआर (अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड) बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी हे मत व्यक्त केलं आहे. कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यात यावं आणि त्याला कोणताही धोका नसावा अशी चर्चा सगळीकडेच असताना सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनीच हा अंदाज व्यक्त केल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

मुंबई उच्च न्यायालय अथवा सुप्रीम कोर्टात सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले तरी आरक्षण टिकण्याची शक्यता आहे. कारण याचिकेत या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर या संदर्भात ही याचिका मुख्य याचिकेसोबत स्वलग्नीत करण्यात येईल आणि तोपर्यंत मराठा आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल, असा त्यांना विश्वास आहे.– एओआर (अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड) बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव

…तर मराठ्यांसह ओबीसींनाही आरक्षण मिळणार नाही : भुजबळ

राज्यात 50 टक्केच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडून 52 टक्के आरक्षण देण्यात आलयं मात्र 50 टक्यांवरच्य़ा अधीकच्या दोन टक्क्यांना कोर्टानं स्टे आणलाय. हे वरील दोन टक्के आरक्षण गोवारी आणि कोष्टी समाजाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तो कोर्टाने मान्य केलेला नाही त्यामुळे हा समाज ओबीसीमध्ये आला. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण 19 टक्क्यांवरून 17 टक्क्यांवर आलं आहे. आता मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते ओबीसीमध्ये येणार. त्यामुळे सरकारने आरक्षण देताना काळजी घ्यावी. नाहीतर मराठा समाजालाही काही भेटणार नाही आणि ओबीसी समाजालाही काही भेटणार नाही. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या केंद्र सरकारच्या परिपत्रकात 50 टक्क्यांवरील 2 टक्के आरक्षण लागू नसल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याच सांगायला ही छगन भुजबळ विसरले नाहीत.

मराठा मोर्चाच्या दोन गटात वाद

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आला असतांना मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या दोन गटात वाद निर्माण झाला आहे. मराठा ठोक मोर्चाचे उपोषण दाबण्याचा सरकारने मराठा क्रांती मोर्चाला पुढे आणत संवाद यात्रा काढायला लावली, मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सरकारचे दलाल आहेत, असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयकांनी केला आहे. सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आझाद मैदान येथील आमरण उपोषण सुरूच राहील असा इशाराही ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे. मराठा ठोक मोर्चाच्या आरोपांना उत्तर देतांना मराठा क्रांती समन्वयकांनी मराठा ठोक मोर्चा चे पदाधिकारी सरकारचे प्यादे आहेत. ते तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजाच्या न्याय हक्कासाठी मराठा क्रांती मोर्चा लढत आहे. ही लढाई आम्ही संयमाने लढत आहोत असं उत्तर दिले आहे. मागासवर्गीय आयोगाला मराठा ठोक मोर्चाने विरोध केला होता आम्ही मागासवर्गीय आयोगाचा स्वीकार केला तेव्हा मराठा आरक्षण मार्गी लागत असल्याचे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सांगितले आहे.