शर्मिला ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयात

| Updated on: Jan 14, 2020 | 10:15 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आज (14 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी थेट मंत्रालयात दाखल झाल्या आहेत (Meeting of Sharmila Thackeray and Ajit Pawar).

शर्मिला ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयात
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आज (14 जानेवारी) यांनी आज थेट मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.  (Meeting of Sharmila Thackeray and Ajit Pawar). मुंबईतील वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याप्रकरणी सरकारने तातडीने मदत करावी, यासाठी शर्मिला ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. शर्मिला ठाकरे यांनी उप आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासोबत वाडिया हॉस्पिटलच्या प्रश्नावर चर्चा  केली.

वाडिया रुग्णालय बंद होणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. 46 कोटी रुपये राज्य सरकार आणि महापालिका देणार आहेत. अजित पवार यांनी शब्द दिलेला आहे. ते स्वतः अर्थमंत्री आहेत. त्यामुळे आर्थिक तरतूद करणं त्यांच्याच हातात होतं. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर गोष्टींसाठी 105 कोटी रुपये बाकी आहेत. त्यावरही लवकरच निर्णय होईल, असं शर्मिला ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितलं.

शर्मिला ठाकरे यांनी वाडियाचा प्रश्नात व्यक्तिगत लक्ष घातलं आहे. सोमवारी (13 जानेवारी) देखील त्यांनी स्वतः वाडिया येथील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या (Meeting of Sharmila Thackeray and Ajit Pawar).

अजित पवार यांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “अजित पवार यांनी वाडियासाठी 46 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आहे. राज्य सरकार आणि महापालिका मिळून हे पैसे देतील. अजित पवार यांनी शब्द दिलेला आहे. ते स्वतः अर्थमंत्री आहेत. त्यामुळे आर्थिक तरतूद करणं त्यांच्याच हातात होतं. म्हणूनच त्यांचीच भेट घेतली. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर गोष्टींसाठी 105 कोटी रुपये बाकी आहेत. त्यावरही लवकरच निर्णय होईल.”

दरम्यान, वाडियाच्या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी वेळोवेळी भूमिका घेतली आहे. आंदोलकांना भेट दिल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या, “मध्यमवर्गीय लोकांसाठी वाडिया रुग्णालय अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही महापालिका आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा करत आहोत. रुग्णालायतील बेड वाढवल्याने अडचणी झाली असं ऐकलं. पण लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे सदसदविवेक बुद्धीने सरकारने ग्रॅंट द्यायला हवी.”

राज्यात आणि मुंबईत कुणाचंही सरकार असलं तरी रुग्णालयाला मिळणारी ग्रॅंट थांबायला नको. मी वाडियात आले आहे. आम्ही रुग्णालय बंद पडू देणार नाही. परिचारिकेंचे पगारही थकले आहेत. रुग्णालयात रुग्ण सेवा ठप्प असल्याची नोटीस लावण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाही समजावलंय. कोणत्याही परिस्थितीत रुग्णालय बंद होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शर्मिला ठाकरे यांनी घेतली आहे.

व्हिडीओ पाहा: