‘राष्ट्रमंच’ची बैठक शरद पवारांच्या घरी, मात्र त्यांनी ती बोलावलीच नव्हती : राष्ट्रवादी काँग्रेस

| Updated on: Jun 22, 2021 | 6:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. राष्ट्रमंचच्या (Rashtra Manch) बॅनरखाली शरद पवारांच्या दिल्लीतील घरी दुपारी चारच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली.

राष्ट्रमंचची बैठक शरद पवारांच्या घरी, मात्र त्यांनी ती बोलावलीच नव्हती : राष्ट्रवादी काँग्रेस
opposition meet at Sharad Pawar residence
Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रमंचच्या (Rashtra Manch) बॅनरखाली शरद पवारांच्या दिल्लीतील घरी दुपारी चारच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक तब्बल अडीच तास चालली.  ही बैठक राष्ट्रमंचची आहे, तिसऱ्या आघाडीची नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक असली तरीही या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या बैठकीला दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत राष्ट्रमंचचे नेते यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्यासह 15 पक्षांचे नेते उपस्थित  होते.

या बैठकीनंतर यशवंत सिन्हा, माजिद मेमन यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली.  माजिद मेमन म्हणाले, ही सभा राष्ट्रमंचची होती, ती भाजपविरोधी असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नव्हतं. जरी ही बैठक शरद पवारांच्या घरी झाली असली तरी ती त्यांनी बोलवली नव्हती तर ती राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती. हे राजकीय मोठं पाऊल असून या बैठकीतून काँग्रेसलला डावललं अशाही बातम्या येत आहेत. मात्र त्यामध्ये तथ्य नाही. राष्ट्रमंचचे सर्व सदस्य या बैठकीला येऊ शकतात. मनिष तिवारी, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, शत्रूघ्न सिन्हा या काँग्रेस खासदारांनाही आम्ही निमंत्रण दिलं होतं. मात्र काही खासगी कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी या बैठकीला पाठिंबा दिला. या बैठकीत देशातील राजकीय, सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली. या बैठकीत केवळ राजकीय नेतेच नव्हते, विविध क्षेत्रातील दिग्गज होते. त्यामुळे केवळ राजकीय रुप देणं योग्य नाही”

घनश्याम तिवारी काय म्हणाले? 

समाजवादी पक्षाचे नेते आणि राष्ट्रमंचचे संस्थापक सदस्य घनश्याम तिवारी यांनीही या बैठकीबाबतची माहिती दिली.

देशात अलटर्नेट व्हिजन तयार करणं गरजेचं. या मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. यशवंत सिन्हा याबाबत एक टीम तयार करतील. ही टीम देशाला एक व्हिजन देत राहील. यात देशातील सर्व स्तरातील लोकांचा समावेश असेल. अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शेतकरी, इंधन, केंद्र-राज्य संबंधं अशा अनेक मुद्द्यांवर ही टीम कार्य करणार आहे, असं घनश्याम तिवारी म्हणाले.

शरद पवार यांच्या घरी ओमर अब्दुल्ला,  यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे सुशिल गुप्ता, आरएलडीचे जयंत चौधरी, सपाकडून घनश्याम तिवारी, गीतकार जावेद अख्तर, पवन वर्मा, के सी सिंग, माजीद मेमन, वंदना चव्हाण, जस्टीस ए पी शाह उपस्थित होते.

त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या संसदीय बोर्डाची बैठक झाली. या बैठकीला केरळमधील राष्ट्रवादीचे नेते पी. सी. चाको, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादीचे इतर नेतेही उपस्थित होते

बैठकीला कोण उपस्थित

राजकारण्यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांना या बैठकीत पाचारण करण्यात आलं आहे. या बैठकीला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ केटीएस तुलसी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, केसी सिंह, गीतकार जावेद अख्तर, प्रीतीश नंदी, ज्येष्ठ वकील कोलिन गोन्साल्वीज, करण थापर आणि आशुतोष या बैठकीत सामिल होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या 

पवारांच्या घरी बैठक होणार, पण तिसऱ्या आघाडीसाठी नाही; तरीही तर्कवितर्क सुरूच!

तिसऱ्या आघाडीचं मॉडेल गैरलागू, तिसरी-चौथी आघाडी भाजपला आव्हान देईल असं वाटत नाही; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीपासून शिवसेना अलिप्त का?; संजय राऊतांनी सांगितलं कारण