तिसऱ्या आघाडीचं मॉडेल गैरलागू, तिसरी-चौथी आघाडी भाजपला आव्हान देईल असं वाटत नाही; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

एककीकडे राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी दोनदा भेट घेऊन देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. (prashant kishor)

तिसऱ्या आघाडीचं मॉडेल गैरलागू, तिसरी-चौथी आघाडी भाजपला आव्हान देईल असं वाटत नाही; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान
Prashant Kishor

नवी दिल्ली: एककीकडे राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी दोनदा भेट घेऊन देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. दुसरीकडे विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पवारांनी कंबर कसलेली असतानाच प्रशांत किशोर यांनी मोठं विधान केलं आहे. तिसऱ्या आघाडीचं मॉडल गैरलागू आहे. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल असं वाटत नाही, असं किशोर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. किशोर यांचं विधान वस्तुस्थिती आहे की भाजपला गाफील ठेवण्यासाठी टाकलेली गुगली आहे? याबाबत वेगवेगळे कयास लगावले जात आहेत. (Don’t Believe 3rd, 4th Front Can Challenge BJP, says Prashant Kishor)

प्रशांत किशोर यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. मी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तिसरी आघाडी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल, याचा मला विश्वास वाटत नाही, असं किशोर म्हणाले.

तिसऱ्या आघाडीचं मॉडेल गैरलागू

तिसऱ्या आघाडीचं मॉडेल वापरून झालं आहे. हे मॉडेल जुनं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीला हे मॉडेल अनुकूल नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी शरद पवारांशी झालेली भेट, त्याचे काढण्यात आलेले राजकीय अर्थ यावरही त्यांनी भाष्य केलं. पवारांची भेट घेतली. एकमेकांना जाणून घेण्यासाठी ही भेट होती. आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही. त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पवारांसोबत केवळ राजकीय चर्चा

पवारांसोबतच्या बैठकांमध्ये केवळ राजकीय चर्चा होत असतात. प्रत्येक राज्यात भाजपच्या विरोधात कसं लढता येईल? कोणत्या गोष्टी उपयोगी पडतील आणि कोणत्या नाही, यावर या बैठकीत चर्चा होते, असं सांगतानाच संभाव्य तिसऱ्या आघाडीचं मॉडेल आतासाठी नाही. त्यांच्या योजनेत त्याचा समावेश नाही, असंही त्यांनी सांगितलं. पवार त्यांच्या प्रदीर्घ अनुभव आणि नेटवर्किंग कौशल्याने ओळखले जातात. तर मी राजकीय स्ट्रक्चर देऊ शकतो, असं ते म्हणाले.

ममतादीदींच्या विजयाने बळ मिळालं

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या विजयावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपच्या विरोधात आपण उभं राहू शकतो. त्यांना आव्हान देऊ शकतो, हा संदेश ममता बॅनर्जी यांच्या विजयातून विरोधी पक्षांना गेला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसला जाणीव व्हावी

यावेळी त्यांनी काँग्रेसचं परखड शब्दात विश्लेषण केलं. काँग्रेसमध्ये एक समस्या आहे. आणि ही समस्या दूर केली पाहिजे, याची काँग्रेसला जाणीव झाली पाहिजे, असं परखड मतही त्यांनी मांडलं. (Don’t Believe 3rd, 4th Front Can Challenge BJP, says Prashant Kishor)

 

संबंधित बातम्या:

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीपासून शिवसेना अलिप्त का?; संजय राऊतांनी सांगितलं कारण

पवार-प्रशांत किशोर यांच्यात पावणे दोनतास खलबतं; विरोधकांच्या मंगळवारच्या बैठकीचा अजेंडा ठरला?

‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्ष एकवटणार?, पवारांनी 15 पक्षांची बैठक बोलावली; भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू

प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है!

(Don’t Believe 3rd, 4th Front Can Challenge BJP, says Prashant Kishor)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI