AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीपासून शिवसेना अलिप्त का?; संजय राऊतांनी सांगितलं कारण

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीपासून शिवसेना अलिप्त असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडदा पाडला आहे. (sharad pawar)

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीपासून शिवसेना अलिप्त का?; संजय राऊतांनी सांगितलं कारण
शरद पवार, संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 10:27 AM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीपासून शिवसेना अलिप्त असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडदा पाडला आहे. पवारांकडे होणारी बैठक विरोधी पक्षाची बैठक नाही. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. तेवढंच या बैठकीला महत्त्व आहे. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला. (Not A Third Front Meet at sharad pawar home, says sanjay raut)

शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत मीडियाशी बोलत होते. तुम्हाला कुणी सांगितलं ही विरोधी पक्षाची बैठक आहे? या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव कुठे आहेत? त्यांची काय वेगळी तिसरी आघाडी आहे का? असा सवाल करतानाच ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची बैठक आहे. त्यापलिकडे या बैठकीचं महत्त्व वाटत नाही, असं राऊत म्हणाले.

पवारांशी कालच फोनवर चर्चा

आजच्या बैठकीत काही महत्त्वाचं होईल असं वाटत नाही. पवार मोठे नेते आहेत. विविध क्षेत्रातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असतात. काल माझं पवारांशी फोनवर बोलणं झालं. आजची बैठक ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची आहे. त्यांचे काही मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. देशातील विरोधी पक्षांची ही बैठक नाही. फार फार तर मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे, असं म्हणता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

मोदी विरोधी शब्द चुकीचा

मोदी विरोधी, भाजप विरोधी असे शब्द वापरणं योग्य नाही. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष प्रबळ करणं हे गरजेचं आहे. पवार तेच करत आहेत. त्यामुळे मोदी विरोधी, भाजप विरोधी असे शब्द वापरणं चुकीचं आहे, असं सांगतानाच काँग्रेस, शिवसेनेशिवाय देशात तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांतदादांचं दु:ख समजू शकतो

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. शरद पवार आणि शिवसेना सत्तेत एकत्र आहेत हे ते विसरतात. पवार-शिवसेना एकत्र असल्यामुळेच तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात. अर्थात तुमचं हे दु:ख समजू शकतो, असा चिमटा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना काढला. तर, चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत? कोणत्या पक्षात आहेत हे मला माहीत नाही. ते भाजपचे आहेत का हे मला माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. (Not A Third Front Meet at sharad pawar home, says sanjay raut)

संबंधित बातम्या:

पवार-प्रशांत किशोर यांच्यात पावणे दोनतास खलबतं; विरोधकांच्या मंगळवारच्या बैठकीचा अजेंडा ठरला?

‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्ष एकवटणार?, पवारांनी 15 पक्षांची बैठक बोलावली; भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू

प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है!

(Not A Third Front Meet at sharad pawar home, says sanjay raut)

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.