विद्यापीठात आमच्यापेक्षा जास्त राजकारण चालतं, इथे शिकलेले राजकारणी पण आमच्याकडे कमी शिकलेले : नितीन गडकरी

| Updated on: Jul 25, 2021 | 1:06 PM

विद्यापीठात आमच्यापेक्षा जास्त राजकारण चालतं कारण इथे शिकलेले राजकारणी आहेत... आमच्या कडे कमी शिकलेले आहेत, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं.

विद्यापीठात आमच्यापेक्षा जास्त राजकारण चालतं, इथे शिकलेले राजकारणी पण आमच्याकडे कमी शिकलेले : नितीन गडकरी
नितीन गडकरींच्या हस्ते केंद्रीय मंत्र्यांचा दिल्लीत सत्कार
Follow us on

नागपूर : विद्यापीठात आमच्यापेक्षा जास्त राजकारण चालतं कारण इथे शिकलेले राजकारणी आहेत… आमच्या कडे कमी शिकलेले आहेत, असं मिश्लिकपणे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सत्य परिस्थितीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या भाषणात शाब्दिक फटकेबाजी केली.

नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या भूमिपूजन सोहळ्याला नितीन गडकरी उद्घाटक होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. विद्यापीठाला कानपिचक्या देत त्यांनी विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रम होतंय, ते सांभाळा, नसेल जमत तर मला सांगा, असं म्हटलं.

‘विद्यापाठीकडे खूप जागा, रक्षण करता येत नसेल तर मला सांगा…’

गडकरी म्हणाले, तुमच्याकडे (विद्यापीठाकडे) भरपूर जागा आहे. त्याचं रक्षण करता येत नसेल तर मला सांगा, मी विद्यापीठाची जागा वाचविण्यासाठी लढलो, आणखी लढेन, अशा कानपिचक्या गडकरींनी दिल्या. पुढे बोलताना गडकरी म्हणाले, “15 ते 20 वर्षापासून सिंथेटिक ट्रॅकची मागणी होत होती… शहरात अनेक चांगले खेळाळू आहेत मात्र त्यांना प्रॅक्टिस करायला ट्रॅक नव्हता, तो आता 8 कोटी खर्च करुन बनवत आहे…”

विद्यापीठात आमच्यापेक्षा जास्त राजकारण चालतं

विद्यापीठात आमच्यापेक्षा जास्त राजकारण चालतं कारण इथे शिकलेले राजकारणी आहेत… आमच्या कडे कमी शिकलेले आहेत. गमतीचा भाग जाऊ द्या, पण खरंच विद्यापाठीत खूपच राजकारण चालतं, असं गडकरी म्हणाले.

मी विद्यापीठापासून एक उड्डाणपूल तयार करतो आहे. शहरात अनेक मैदानं विकसित केली आहेत. त्याचा फायदा होत आहे… विद्यापीठ परिसरात वृक्ष लावण्याचं काम करावं, त्यासाठी पुढाकार घ्यावा …ऍग्रो कन्व्हेन्शन सेंटर तयार केलं जाणार आहे, त्याच काम लवकरच सुरू होईल. त्यातून शेतकऱ्यांना मोठं मार्गदर्शन होईल, असं गडकरींनी यावेळी सांगितलं.

विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करा

त्याचप्रमाणे तेलंखेडी गार्डन मध्ये जागतिक दर्जाचं फाउंटन उभं होतं आहे, त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मदत करायला तयार आहेत. विद्यापीठाचा विकास करण्यासाठी त्यांची मदत घ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करा, असं मार्गदर्शन गडकरींनी यावेळी केलं.

(Minister Nitin Gadkari Speech Synthetic Track Bhumipujan in Nagpur)

हे ही वाचा :

‘चहाच्या टपरीचं उद्घाटन करा’, कार्यकर्त्याची इच्छा, अजितदादा म्हणाले, ‘चहाला क्वालिटी हाय ना, आण बरं जरा…’

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, बारामतीत काय घडलं, ज्यामुळे अजितदादांचा पारा चढला!