AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चहाच्या टपरीचं उद्घाटन करा’, कार्यकर्त्याची इच्छा, अजितदादा म्हणाले, ‘चहाला क्वालिटी हाय ना, आण बरं जरा…’

माझ्या चहाच्या टपरीचं उद्घाटन करा, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखलवल्यावर अजितदादांनी उद्घाटन तर केलंच शिवाय त्याच्या टपरीतल्या चहाचाही आस्वादही घेतला. | Ajit Pawar

'चहाच्या टपरीचं उद्घाटन करा', कार्यकर्त्याची इच्छा, अजितदादा म्हणाले, 'चहाला क्वालिटी हाय ना, आण बरं जरा...'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चहाच्या टपरीचं उद्घाटन करत चहाचा आस्वाद घेतला...
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 12:24 PM
Share

बारामती (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादा बारामती दौऱ्यावर असताना त्यांची अनेक रुपे बारामतीकरांना पाहायला मिळतात. अजितदादांचं असंच एक दिलखुलास रुप आज बारामतीत पहायला मिळाले. माझ्या चहाच्या टपरीचं उद्घाटन करा, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखलवल्यावर अजितदादांनी उद्घाटन तर केलंच शिवाय त्याच्या टपरीतल्या चहाचाही आस्वादही घेतला.

‘चहाच्या टपरीचं उद्घाटन करा’, कार्यकर्त्याची इच्छा

बारामती दौऱ्यावर असताना एका टपरी चालकाने माझ्या चहाच्या टपरीचे उद्घाटन करा, अशी इच्छा अजितदादांजवळ व्यक्त केली. ती इच्छा व्यक्त करताच अजितदादांनी त्या टपरी चालकाच्या इच्छेला मान दिला. फिरत्या वाहनावर चहा स्टॉल सुरु केला आहे याचे उद्घाटन आपण करावे अशी इच्छा आहे, असं इच्छा बोलून दाखवल्आनंतर अजितदादा कार्यकर्त्याच्या टपरीवर पोहोचले.

‘चहाला क्वालिटी हाय ना?, आण बरं चहा’

आज बारामती मध्ये विविध कामाचे उद्घाटन अजित पवार करत होते. त्यानंतर बारामती येथे महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटपून जात कार्यकर्त्यांच्या टपरीचं उद्घाटन करण्यासाठी अजितदादा टपरीवर पोहोचले आणि कार्यकर्त्याच्या इच्छेखातर चहाच्या टपरीचे उद्घाटन केले. त्यानंतर अजितदादांनी ‘तू बनवलेला चहा कसाय?, चहाला क्वालिटी हाय ना?, आण बरं चहा’ असं म्हणत चहाची चवही घेतली.

टपरी चालकाला आभाळ ठेंगणं झालं!

कोणताही प्रोटोकॉल न मानता प्रसंगी प्रोटोकॉल बाजूला ठेऊन अजित दादांनी आपल्या कार्यकर्त्याच्या इच्छेखातर एका चहाच्या टपरीचं उद्घाटन केलं. संबंधित टपरी चालकाचा तर आनंद गगनात मावत नव्हता. त्याच्या आनंद द्विगुणित झाला होता. बारामतीत अजितदादांच्या या दिलखुलास स्वभावाची आज एकच चर्चा होती.

बारामतीमधल्या एका कार्यक्रमात अजितदादांचा पारा चढला!

दुसरीकडे आज बारामतीतल्या एका कार्यक्रमात अजितदादांचा पारा चढला. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं. ‘माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावं’, अशी विनंती संबंधित व्यक्तीने अजितदादांकडे केली. निवेदन पाहून अजितदादा भडकले. त्यावर ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात अजितदादांनी संबंधित व्यक्तीला सुनावलं.

(DCM Ajit Pawar Inaugurate tea Stall in baramati)

हे ही वाचा :

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, बारामतीत काय घडलं, ज्यामुळे अजितदादांचा पारा चढला!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.