यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यात सौंदर्यावरून जुंपली! राणांच्या टीकेला ठाकुरांचं प्रत्युत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन झालेला वाद आणि महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात सातत्याने टीकेचे बाण सोडले जात आहेत. आता या दोन महिला लोकप्रतिनिधींमधील राजकीय टीका आता सौंदर्यावर पोहोचलीय.

यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यात सौंदर्यावरून जुंपली! राणांच्या टीकेला ठाकुरांचं प्रत्युत्तर
यशोमती ठाकूर, नवनीत राणा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 9:22 AM

स्वप्निल उमप, टीव्ही 9 मराठी, अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. पुतळ्याच्या वादावरुन खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्याकडून यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर आरोप करण्यात आला. तर यशोमती ठाकूर यांनीही वेळोवेळी राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर दिलंय. अशावेळी आता पुन्हा एकदा नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. हा वादाचं कारणही विशेष आहे. राणा आणि ठाकूर यांच्यात सौंदर्यावरुन जुंपल्याचं पाहायला मिळत आहे!

अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा या दोन महिला प्रतिनिधींमधील वैद सर्वश्रृत आहे. दोन्ही महिला लोकप्रतिनिधी एकमेकींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन झालेला वाद आणि महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात सातत्याने टीकेचे बाण सोडले जात आहेत. आता या दोन महिला लोकप्रतिनिधींमधील राजकीय टीका आता सौंदर्यावर पोहोचलीय.

कितीही काही केलं तरी वय दिसणारच – राणा

काही दिवसांपूर्वी एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वयाचा उल्लेख केला होता. कितीही काही केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे दिसणारच. माझ्यापेक्षा 10 – 15 वर्षांनी मोठ्या आहेत. तेवढं वय दिसणारच, अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती.

चेहऱ्यावरील खड्डे हेच शेतकऱ्याच्या मुलीचं खरं सौंदर्य- ठाकूर

त्यावर यशोमती ठाकूर यांनीही आता नवनीत राणांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. माझ्या पायाला ज्या भेगा पडल्या आहेत, हातावर घटे आणि चेहऱ्यावरील खड्डे हेच शेतकऱ्याच्या मुलीचं खरं सौंदर्य आहे. त्यामुळे माणूस गोड असून चालत नाही तर त्याचं काम गोड असलं पाहिजे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्या टीकेला उत्तर दिलंय.

इतर बातम्या :

विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात, तर सुप्रिया सुळेंनी जोडले केंद्राला हात

Video : खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग! ‘जलमंदिर’ परिसरात मारला फेरफटका