‘भविष्यात आमदारही होणार नाही…’, CM फडणवीसांच्या खास नेत्याचा रोहित पवारांना इशारा
रोहित पवार याना घरात काहीही किंमत नाही, पवार साहेब आणि सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड कोणाशी याचं जमत नाही. मी या राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय," अशी घणाघाती टीका राजेंद्र राऊत यांनी केली आहे.

सागर सुरवसे, प्रतिनिधी: Rajendra Raut On Rohit Pawar: रोहित पवार हे मढ्याच्या टाळुवरचं लोणी खायचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर चालेलंल पिल्लू आहे, ते कुठल्याही विषयावर राजकारण रोहित पवार करत आहेत, देवेंद्र फडणवीस यांचं अजित दादांवर किती प्रेम होते ते आम्ही जवळून पाहिलं आहे, असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार यांनी तोंड सांभाळून बोलावे असा थेट इशारा दिला आहे.
काय म्हणालेत राजेंद्र राऊत?
“रोहित पवार ही डोक्यावर पडलेली व्यक्ती आहे. रोहित पवार म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारी औलाद आहे. अजित पवार यांची जागा कसं मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना घरात काहीही किंमत नाही, पवार साहेब आणि सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड कोणाशी याचं जमत नाही. मी या राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय,” अशी घणाघाती टीका राजेंद्र राऊत यांनी केली आहे.
“दादांच्या बाबतीत जे घडलं ते दुर्दैवी आहे, रोहित पवार याने आता तोंड सांभाळून बोलावं. त्याने जे आरोप केलं त्याची फार मोठी किंमत रोहित पवाराला मोजावी लागेल. तू राज्यात मंत्री होण्याचे स्वप्न बघणे सोड, आमदार देखील तू पुन्हा होणार नाही. तु भविष्यात आमदार होतो कि नाही ते बघ गृहमंत्रीपद तर खूप लांबची गोष्ट आहे,” असंही आमदार राजेंद्र राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दाखवलेले फोटो एआयवर सुद्धा केले जाऊ शकतात. सुप्रिया सुळेंची सुद्धा आता डीलिमिटेशनला पाठिंबा देण्याची तयारी झाली आहे. त्याला कुठेचं किंमत नाहीये, त्यामुळे हा असे आरोप करतोय. यांचे सुद्धा कोणाचे कोणासोबत फोटो होते ह्याच्या ही बऱ्याच चर्चा होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवार यांच्यावर प्रेम होते, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात अतिशय दोस्ताना होता,” असंही यावेळी राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले.
