“मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब जेलमध्ये जाईल”, रवी राणांची टीकेची झोड

मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब आज गजाआड जाईल, अश्या शब्दात रवी राणा यांनी अनिल परबांवर टीका केली आहे.

मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब जेलमध्ये जाईल, रवी राणांची टीकेची झोड
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 12:44 PM

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या संपत्तीवर ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात येतेय. त्यावरून आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी अनिल परबांवर टिकेचे बाण सोडलेत. त्यांनी कठोर शब्दात अनिल परबांवर शाब्दिक हल्ला चढवलाय. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा मंत्री मंत्री मातोश्रीचा खजिनदार आहे.वाझेच्या माध्यमातून कलेक्शन जमा करून अनिल परब मातोश्रीवर पोहचवत होते.त्याचा आता या सगळ्याचा भांडाफोड होणार आहे. एस टी कर्मचाऱ्यांनी दिवाळी केली नाही त्यांची दिवाळी परबांमुळे अंधारात गेली. नवनीत राणा यांच्यासारख्या एका महिला खासदाराला अनिल परब यांनी जेलमध्ये टाकलं. मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब आज गजाआड जाईल. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे कारनामे लवकरच बाहेर निघतील”, असं रवी राणा म्हणाले आहेत.

रवी राणा यांचं टिकास्त्र

रवी राणा यांनी कठोर शब्दात अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा मंत्री मंत्री मातोश्रीचा खजिनदार आहे.वाझेच्या माध्यमातून कलेक्शन जमा करून अनिल परब मातोश्रीवर पोहचवत होते.त्याचा आता या सगळ्याचा भांडाफोड होणार आहे”, असं अनिल परब म्हणाले आहेत.

“मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाल्लं”

“नवनीत राणा यांच्या सारख्या एका महिला खासदाराला अनिल परब यांनी जेलमध्ये टाकलं. मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब आज गजाआड जाईल. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे कारनामे लवकरच बाहेर निघतील”, असं रवी राणा म्हणाले आहेत.

अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई

अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे.  तसंच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्य बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं. याच्या आगोदर देखील अनिल ईडीने चौकशी केली आहे. तसेच त्यांच्यासोबत आरटीओच्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली होती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.