Rohit Pawar: भाजपने मतदार कसे वगळले? रोहित पवारांचा ऑडियो बॉम्ब; थेट पुरावाच दाखवला

निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी विचारांच्या खऱ्या मतदारांची मतदार यादीतून नावं भाजपाने कशी वगळली आणि रडीचा डाव खेळून सत्ता कशी मिळवली त्याचा घ्या हा पुरावा.. असे म्हणत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Rohit Pawar: भाजपने मतदार कसे वगळले? रोहित पवारांचा ऑडियो बॉम्ब; थेट पुरावाच दाखवला
| Updated on: Nov 19, 2026 | 10:05 PM

Rohit Pawar News:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर मतचोरीचा आरोप करत जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी यासंबंधीची एक कथित ऑडियो क्लीप व्हायरल केली आहे, यामध्ये त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने नावे वगळली, असा गंभीर आरोप केला आहे. नेमकी काय आहे ही ऑडियो क्लीप? जाणून घ्या…

ऑडियो क्लीपमध्ये नेमकं काय?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मतदारांची नावे खोटे अर्ज करुन कमी करुन घेतल्याचा धक्कादायक दावा या ऑडियो क्लीपमध्ये करण्यात आला आहे. यासंबंधीत तहसिलदारांकडे आलेल्या तक्रारीनुसार बोगस अर्जदारांनी किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या मतदारांचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी असल्याचे वकील राहुल मखरे सांगत आहेत. याचसंदर्भात त्यांचे एका भाजप कार्यकर्त्याशी बोलणे झाल्याचं या ऑडियो क्लीपमध्ये दिसत आहे.

Loading...

या कथित ऑॉडियो क्लीपमध्ये वकील राहुल मखरे नावाची व्यक्ती बोलत आहे. ही व्यक्ती कोकाटे या दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी अर्ज केला होता का? अशी विचारणा करत आहे. मात्र मी फक्त मृत व्यक्तींची नावे कमी करण्यासाठी अर्ज केला होता. ही नावे कोणी दिली याबाबत माहितीच नसल्याचे सांगत आहे.

तसेच मी कामात होतो त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आले त्यांनी मला फक्त सही करायला सांगितले. ही कागदे भाजप कार्यालयातून आली होती. मी फक्त सही केली होती, मात्र पुढे काय झाले? याबाबत मला माहिती नाही असं हा भाजप कार्यकर्ता सांगत आहे. वकील राहुल मखरे यांनी गुन्हा नोंद करणार असल्याचे सांगत असताना तुम्हाला करायचे असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करा? असं म्हणत आहे.

रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा! 

दरम्यान, या ऑडियो क्लीपवरुन रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी विचारांच्या खऱ्या मतदारांची मतदार यादीतून नावं भाजपाने कशी वगळली आणि रडीचा डाव खेळून सत्ता कशी मिळवली त्याचा घ्या हा पुरावा, या ऑडिओतून शंभर टक्के खात्री झाली की या सरकारला मतदारांनी निवडून दिल नाही तर यांनी मतांची चोरी करुन सत्तेचा इमला बांधला. त्यामुळं एक क्षणही या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

(टीप: टीव्ही 9 मराठी या ऑडियो क्लीपची पुष्ठी करत नाही) 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us