कल्याणमध्ये काटई टोलनाका बंद, शिवसेना-मनसेत श्रेयवाद, राज्य सरकारने नेमका टोलनाका बंद का केला?

| Updated on: Mar 12, 2021 | 11:34 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे (MNS MLA Raju Patil criticize ShivSena MP Shrikant Shinde over Katai toll naka closed).

कल्याणमध्ये काटई टोलनाका बंद, शिवसेना-मनसेत श्रेयवाद, राज्य सरकारने नेमका टोलनाका बंद का केला?
आमदार राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे
Follow us on

कल्याण (ठाणे) : टोलनाका बंद करण्यावरुन शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. वाहतुकीसाठी अडथळा असलेल्या काटई टोलनाका बंद केल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर “कंत्राट संपल्याने हा टोलनाका बंद करण्यात आला आहे. याचे श्रेय घेण्याची गरज नाही”, असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांना लगावला आहे (MNS MLA Raju Patil criticize ShivSena MP Shrikant Shinde over Katai toll naka closed).

खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नेहमी कोणत्या न कोणत्या मुद्यावरुन एकमेकांना टोमणे मारण्याची संधी न सोडणारे शिवसेना-मनसे नेते पुन्हा एकदा टोल नाका बंद करण्याच्या मुद्यावर आमनेसामने आले आहेत.

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील काटई आणि कोन हे दोन्ही टोलनाके बंद करण्यात आले आहे. या टोल नाक्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची. तसेच या रस्त्यांचे सहा पदरीकरण सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे हे नाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली. त्यासाठी आपण पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

मनसे आमदार राजू पाटील काय म्हणाले?

दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी काटई टोलनाका बंद करावा, अशी मागणी सप्टेंबर महिन्यापासून राज्य सरकारकडे लाऊन धरली होती. पण आता टोल नाक्याचे कंत्राट संपले म्हणून तो बंद केला आहे. त्याचे श्रेय कोणी घेऊ नये. तरीदेखील एमएसआरसीटीचे मी आभार मानतो, असं राजू पाटील म्हणाले (MNS MLA Raju Patil criticize ShivSena MP Shrikant Shinde over Katai toll naka closed).

‘किराना दुकानात संध्याकाळी सात नंतर तर बारमध्ये अकरानंतर कोरोना जातो’

कल्याणमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या संख्येने वाढू लागला आहे. त्यामुळे केडीएमसी महापालिकेने कडक निर्बंध घातले आहेत. शहरातील किराना दुकान संध्याकाळी सात वाजेनंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर दारुच्या दुकानांना रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुनही आमदार राजू पाटील यांनी निशाणा साधला.

“किराना दुकानात सातनंतर कोरोना जातो बारमध्ये 11 नंतर करोना जातो. या शहरातील जास्तीत जास्त लोक हे नोकरदार आहेत. ते मुंबईहून कामावरुन घरी पतरणार कधी आणि खरेदी करणार कधी?”, असा सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

“कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारकडे कोरोनाचा एक्झॅट प्लान नाही. लसीकरण सुरु होऊन दोन महिने झाले. तरीपण संख्या वाढतेय. कोरोनासोबत आपल्याला जगायचे आहे हे फक्त बोलण्यापुरते आहे. प्रॅक्टीकल जाऊन लसीकरण सुरु करा. लोकांशी ज्यांचा जास्त संपर्क येतो त्यांना लसीकरणात प्राधान्याने समावून घेतले पाहिजे”, अशी मागणी देखील राजू पाटील यांनी राज्य सरकारकडे केली.
हेही वाचा : यूट्यूबर असाल तर सावधान ! यूट्यूबकडून तब्बल 30 हजार व्हिडओ डिलीट, कारण काय?