यूट्यूबर असाल तर सावधान ! यूट्यूबकडून तब्बल 30 हजार व्हिडओ डिलीट, कारण काय?

prajwal dhage

|

Updated on: Mar 12, 2021 | 10:08 PM

चुकीची माहिती पसरवल्यामुळे यूट्यूबने नुकतेच 30 हजार व्हिडीओ हटवले आहेत. (you tube video corona virus)

यूट्यूबर असाल तर सावधान ! यूट्यूबकडून तब्बल 30 हजार व्हिडओ डिलीट, कारण काय?
सांकेतिक फोटो

मुंबई : अनेकजण यूट्यूबवर ((you tube) वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ अपलोड करतात. या व्हिडीओंच्या माध्यामातून आजकाल अनेकजण चांगली कमाई करत आहेत. मात्र, चुकीची माहिती पसरवल्यामुळे यूट्यूबने नुकतेच 30 हजार व्हिडीओ हटवले आहेत. हे व्हिडीओ मागील सहा महिन्यांपासूनचे आहेत. (you tube has removed 30000 video which give false information of corona virus)

सहा महिन्यांतील 30000 व्हिडीओ हटवले

IANS या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार यूट्यूबने मागील सहा महिन्यातील तब्बल 30 हजार व्हिडीओ डिलीट केले आहेत. कोरोना व्हायरस, लसीकरण, लस यासंबंधी चुकीची माहिती दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म यूट्यूबने फेब्रुवारी 2020 पासून कोविड-19 विषयी चुकीची माहिती देणारे आतापर्यंत 800,000 पेक्षा अधिक व्हिडीओ डिलीट केले आहेत. ही कारवाई करताना Artificial intelligence चा उपयोग केला जातो. तसेच काही व्हिडीओंच्या बाबतीत मानवी समिक्षासुद्धा केली जाते.

ट्विटरचाही कडक पवित्रा

मिळालेल्या माहितीनुसार यूट्यूब गाईडलाईन्सचे पालन न केल्यामुळेसुद्धा यूट्यूबने हा निर्णय घेतला आहे. फेसबूक आणि ट्विटरनेसुद्धा कोरोनाविषयक खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कडक पाऊल उचलले आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाविषयी चुकीची माहिती शेअर केल्यामुळे काही अकाउंट्स कायमस्वरुपी तर काही अकाउंट थोड्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्विटरकडून आतापर्यंत 1.15 खात्यांवर कारवाई

कोरोना महामारी तसेच कोरोना लसीविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार थांबावा म्हणून ट्विटरने कडक पॉलिसी राबवण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाविषयक चुकीची माहिती देणाऱ्या तब्बल 1.15 कोटी खात्यांवर ट्विटरने कारवाई केली आहे.

दरम्यान, यूट्यूबने व्हिडीओ हटवण्याची मोहीम सुरु केल्यामुळे यूट्यूबर्सने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणताही कन्टेंट अपलोड करण्यापूर्वी त्याविषयीची सत्यता जाणून घेण्याचा सल्ला जाणाकारांकडून देण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Axis Bank ची कोट्यवधी ग्राहकांसाठी जबरदस्त सुविधा; ‘या’ उपकरणाद्वारे झटपट पैशांचे व्यवहार होणार

जगातला पहिला 18GB RAM वाला स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

YouTube द्वारे पैसे कमवणाऱ्यांना झटका, आता कमाईमधले ‘इतके’ पैसे टॅक्स म्हणून भरावे लागणार

(you tube has removed 30000 video which give false information of corona virus)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI