YouTube द्वारे पैसे कमवणाऱ्यांना झटका, आता कमाईमधले ‘इतके’ पैसे टॅक्स म्हणून भरावे लागणार

गुगलने नुकतीच एक घोषणा केली आहे जी भारतीय YouTubers ना निराश करु शकते. त्यामुळे आता भारतीय यूट्युबर्स जास्त पैसे कमावू शकणार नाहीत.

YouTube द्वारे पैसे कमवणाऱ्यांना झटका, आता कमाईमधले 'इतके' पैसे टॅक्स म्हणून भरावे लागणार
यूट्यूबचे नवे फीचर लाँच, अधिक पैसे कमवू शकतील व्हिडिओ क्रिएटर्स
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 1:55 PM

मुंबई : गुगलने नुकतीच एक घोषणा केली आहे जी भारतीय YouTubers ना निराश करु शकते. या घोषणेनंतर इंडियन यूट्युबर्स यापुढे व्हिडिओंमधून जास्त पैसे कमावू शकणार नाहीत. सर्व यूट्युबर्सना सर्च जायंटने याबाबतची माहिती ईमेलद्वारे दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, YouTubers ना त्यांच्या व्हिडीओंच्या बदल्यात जे पैसे दिले जातात, कंपनी त्यामधून यूएस कर (US Tax) वजा करेल. यूएसबाहेरील सर्व कंटेंट क्रिएटर्सना हा नवा नियम लागू होईल. अमेरिकन YouTubers वर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. हा कर जून 2021 पासून सुरू केला जाणार आहे. (Youtube content creators in india has to pay US Tax)

Gadgets Now च्या वृत्तानुसार, आपल्या अधिकृत कम्यूनिकेशनमध्ये गुगलने असे म्हटले आहे की, पुढील काही आठवड्यांमध्ये आम्ही आपणास अ‍ॅडसेन्समध्ये कर भरण्याविषयी माहिती विचारू, 31 मे 2021 पर्यंत तुमच्या टॅक्सबाबतची माहिती उपलब्ध नसल्यास, Google तुमच्या महिन्याच्या एकूण कमाईमधून 24 टक्के पैसे वजा करेल.

वापरकर्त्यांना (युजर्सना) इथे एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की या पैशांमध्ये तुम्ही जाहिरात आणि अमेरिकन युजर्सद्वारे मिळवलेल्या पैशांचादेखील समावेश असेल. तसेच या यादीमध्ये यूट्युब प्रीमियम, सुपर चॅट, सुपर स्टिकर्स आणि चॅनेल मेंबरशिप्सचादेखील समावेश असेल. कंपनीने असे म्हटले आहे की, जर तुम्ही कर दस्तऐवजात (टॅक्स डॉक्यूमेंट) संपूर्ण माहिती दिली तर तुम्हाला यूएस बाहेरील दर्शकांसाठी कर भरावा लागणार नाही किंवा त्या पैशांवर कोणताही कर आकारला जाणार नाही.

नवीन कर नियम काय आहे?

YouTube च्या या मेलकडे तुम्ही लक्ष दिले नाही आणि तुमची कर माहिती (टॅक्स इन्फो) सबमिट केली नाही तर तुम्हाला तुमच्या महिन्याच्या एकूण कमाईच्या 24 टक्के रक्कम द्यावी लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही टॅक्स इन्फो जमा केली केली आणि कराराच्या फायद्यांसाठी (ट्रिटी बेनिफिट) पात्र असाल तर तुम्हाला त्या अमेरिकन दर्शकांसाठी 15 टक्के कर भरावा लागेल ज्यांच्या मदतीने तुम्ही पैसे कमावले आहेत. दुसरीकडे, जर तुम्ही कर भरला आणि टॅक्स ट्रिटीसाठी पात्र नसाल तर तुम्हाला 30 टक्के कर भरावा लागेल. हा कर अमेरिकन दर्शकांद्वारे मिळणाऱ्या कमाईवर भरावा लागेल.

भारतीय कंटेंट क्रिएटर्सना किती कर भरावा लागेल?

गुगलने एक उदाहरण देत म्हटले आहे की जर भारतातील एखादा कंटेट क्रिएटर महिन्यात 1000 डॉलर कमावतो आणि त्याने त्यापैकी 100 डॉलर्स अमेरिकन दर्शकांच्या मदतीने कमावले आहेत, तर मग त्याला त्याच्या महिन्याच्या एकूण कमाईच्या 24 टक्के रक्कम टॅक्स स्वरुपात द्यावी लागेल. त्या क्रिएटरला 1000 डॉलर्सचे 24 टक्के म्हणजेच 240 डॉलर्स द्यावे लागतील. या नव्या कर प्रणालीमुळे भारतीय कंटेंट क्रिएटर्सच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होऊ शकते, कारण भारतातील यूट्युबर्सना आधीपासूनच अमेरिकेतील यूट्युबर्सपेक्षा कमी पैसे मिळतात.

हेही वाचा

YouTube वर Video अपलोड करा, मालामाल व्हा, सोप्या टिप्स वाचा

(Youtube content creators in india has to pay US Tax)

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.