Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार

आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक (IPL 2021 TimeTable) जाहीर झालं आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे.

Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार
Jio free Hotstar

मुंबई : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक (IPL 2021 TimeTable) जाहीर झालं आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. (Bcci Announces Schedule For Ipl 2021)

क्रिकेटप्रेमी आता आयपीएल कधी सुरु होतंय, याच्या प्रतीक्षेत आहेत. आयपीएलचे हे सामने टीव्हीवर तर पाहायला मिळणार आहेतच, सोबतच हे सामने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरदेखील पाहू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत, तुमच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनमध्येच तुम्ही आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. (Jio users can watch it IPL 2021 all Matches Live for free on Disney hotstar)

आयपीएलदरम्यान रिलायन्स जियोने (Reliance Jio) आपल्या युजर्ससाठी काही खास प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनअंतर्गत, प्रत्येक युजर कुठेही बसून आयपीएलच्या प्रत्येक सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतो. जियोच्या प्रीपेड प्लॅन युजर्सना 401 रुपयांमध्ये हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. जियोने 400 रुपयांपासून ते 2599 रुपयांपर्यंत वेगवेगळे प्लॅन्स सादर केले आहेत. ज्यामध्ये युजर्सना हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मिळेल. आयपीएलच्या सर्व सामन्यांचे ओटीटी राईट्स हॉटस्टारकडे असल्याने आयपीएलचे सर्व सामने हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत.

Jio चा 401 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांसाठी 90GB डेटा दिला जात आहे. ज्यामध्ये दररोज 3 जीबी डेटा आणि अॅडिशनल 6 जीबी डेटा दिला जात आहे. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Jio चा 499 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5GB डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. परंतु या प्लॅनमध्ये युजर्सना कॉलिग अथवा एसएमएसची सुविधा दिली जाणार आहे.

Jio चा 598 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Jio चा 777 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. तसेच कंपनीने या प्लॅनमध्ये युजर्सना 5 जीबी अॅडिशनल डेटा दिला आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Jio चा 2599 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. तसेच कंपनीने या प्लॅनमध्ये युजर्सना 10 जीबी अॅडिशनल डेटा दिला आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Hotstar सह Jio Apps चं सब्सक्रिप्शन

या प्लॅन्समध्ये कंपनीने युजर्सना Disney+ Hotstar सह JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चं मोफत सब्सक्रिप्शन दिलं आहे.

इतर बातम्या

देशात ‘या’ दोन शहरांत 5G टॉवर आले, जाणून घ्या कधी मिळणार 5G सेवा

इंटरनेटशिवाय WhatsApp वरुन व्हॉईस, व्हिडीओ कॉल करा, जाणून घ्या कसं असेल नवं फीचर

एअरटेल, जिओ आणि व्हीआयचे बेस्ट प्लान, 56 दिवसांच्या वैधतेसह विनामूल्य पहा डिस्ने + हॉटस्टार, झी 5 प्रीमियम आणि प्राईम व्हिडिओ

(Jio users can watch it IPL 2021 all Matches Live for free on Disney hotstar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI