देशात ‘या’ दोन शहरांत 5G टॉवर आले, जाणून घ्या कधी मिळणार 5G सेवा

देशात 'या' दोन शहरांत 5G टॉवर आले, जाणून घ्या कधी मिळणार 5G सेवा

सध्या देशातील दोन शहरांत 5 जी सेवा देणारे टॉवर लावण्यात आले आहेत. (jio telecom bharti airtel five g towers)

prajwal dhage

|

Mar 07, 2021 | 3:57 PM

मुंबई : मागील कित्येक महिन्यांपासून देशात लवकरच 5G ची सेवा कार्यान्वित केली जाईल असे सांगितले जात आहे. त्या दिशेने आता पावलंसुद्धा टाकली जात आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता सन 2022 पर्यंत आपल्याला 5G इंटरनेट सेवा वापरणं शक्य नसल्याचं दिसतंय. केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केला नल्यामुळे ही सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. सध्या देशातील दोन शहरांत 5 जी सेवा देणारे टॉवर लावण्यात आले आहेत. (jio telecom and bharti airtel have teo five g towers in indiana before its launch)

सध्या या दोन शहरांत 5G चे टॉवर

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात या कंपन्यांनी नागरिकांना 5 जी इंटरनेट सेवा देण्यासाठी काम सुरु केल आहे. मात्र, 2022 पर्यंत ही सेवा सुरु होण्याची शक्यता नाही. सरकारने 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव न केल्यामुळे ही प्रक्रिया रखडलेली आहे. Ookla या ग्लोबल नेटवर्क मोजणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एअरटेल आणि जिओ ने भारतातील 2 शहरात 5 जी सेवा देणारे टेस्टींग टॉवर लावले आहेत.

जगात एकूण 21996 5 जी टॉवर्स

Ookla ने दिलेल्या माहितीनुसार देशातील मुंबई आणि हैदराबाद या दोन शहरांत 5 जी टॉवर लावण्यात आले आहेत. हे टॉवर्स टेस्टींगसाठी लावले आहेत. सध्या जगात 5 जी चे एकूण 21, 996 टॉवर्स आहेत. त्यातील दोन भारतात आहेत. Ookla ने सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही टॉवर्स हे टेस्टींग फेजमधील आहेत. याविषयी अधिक माहिती देताना हैदराबाद येथील 5G ची टॉवरची टेस्ट पूर्ण करण्यात आल्याचे भारती एअरटेलने जानेवारी महिन्यात सांगितलं आहे.

दूरसंचार विभागाने नुकतंच 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाचे आयोजन केले होते. या लिलावात प्रीमियम 700 MHz बँड अजूनही विकले गेलेले नाहीत. सध्या 35 पेक्षा जास्त देशात 5 जीची सेवा सुरु आहे. मात्र, 5 जीची सेवा भारतीयांपासून अजून 8 महिने दूर आहे असे सांगितले जात आहे.

इतर बातम्या :

इंटरनेटशिवाय WhatsApp वरुन व्हॉईस, व्हिडीओ कॉल करा, जाणून घ्या कसं असेल नवं फीचर

Oneplus चा मोठा निर्णय, ‘हे’ गॅजेट्स बंद करणार, परवडणाऱ्या दरात ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीज खरेदीची शेवटची संधी

…अन्यथा तुम्ही WhatsApp मेसेज, कॉल्स करु शकणार नाही, WhatsApp ची युजर्सना ताकीद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें