Oneplus चा मोठा निर्णय, ‘हे’ गॅजेट्स बंद करणार, परवडणाऱ्या दरात ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीज खरेदीची शेवटची संधी

Oneplus चा मोठा निर्णय, 'हे' गॅजेट्स बंद करणार, परवडणाऱ्या दरात ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीज खरेदीची शेवटची संधी
OnePlus Horizon sale

वनप्लस (Oneplus) कंपनी त्यांच्या निवडक उत्पादनांवर मोठी सवलत देत आहे. ((OnePlus Final Horizon sale is offering big discounts on Gadgets)

अक्षय चोरगे

|

Mar 07, 2021 | 12:52 PM

मुंबई : वनप्लस (Oneplus) कंपनी त्यांच्या निवडक उत्पादनांवर मोठी सवलत देत आहे. कंपनीने फायनल Horizon (होरायझन) सेल सुरु केला आहे, हा सेल 5 मार्च पासून सुरु करण्यात आला असून 8 मार्चपर्यंत सुरु असणार आहे. यावेळी, चिनी स्मार्टफोन कंपनीने एका लकी ड्रॉचे आयोजन केले आहे. या लकी ड्रॉमध्ये सहभागी होणाऱ्या युजर्सना वनप्लस बँड जिंकण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, कंपनीने काही प्रोडक्ट्स बंद केले आहेत, कंपनी सध्या 8 मार्चच्या कार्यक्रमाला प्रमोट करत आहे. (OnePlus Final Horizon sale is offering big discounts on Power Bank, Buds Z TWS)

वनप्लस 9 सिरीजसाठी आयकॉनिक स्वीडिश कॅमेरामेकर कंपनी Hasselblad बरोबर भागीदारी करत असल्याचे वनप्लसकडून सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, कंपनी वनप्लस 9 सिरीजमधील स्मार्टफोन्सचा कॅमेरा अधिक शक्तिशाली बनवू शकते. या फोनबाबत आतापर्यंत बर्‍याच लीक्सद्वारे फीचर्सबाबतची बरचीशी माहिती समोर आली आहे.

सेलमध्ये कोणत्या प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट

वनप्लस सेलमध्ये ग्राहक वनप्लस पॉवर बँक, वनप्लस बड्स झेड वायरलेस इअरबड्स आणि वनप्लस बड्स TWS इयरफोन सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात. वनप्लस पॉवर बँकची किंमत 1099 रुपयांवरून 888 रुपये करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 10,000 mAh क्षमतेची बॅटरी मिळेल. ही पॉवर बँक ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

वनप्लस बड्स Z TWS इयरफोनची किंमत 2849 रुपये आहे, आधी या इयरफोन्सची किंमत 3100 रुपये इतकी होती. हे इअरफोन्स व्हाईट आणि ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत. वनप्लस बड्स TWS इयरफोनची किंमत 4990 रुपयांवरून 4491 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

लवकरच लाँच होणार OnePlus Nord 2

वनप्लस (OnePlus) कंपनी त्यांची नवीन फ्लॅगशिप वनप्लस 9 सिरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत कंपनी नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) हा स्मार्टफोनदेखील लाँच करू शकते. अँड्रॉयड सेंट्रलच्या मते, नॉर्ड 2 मीडियाटेकचा डायमेन्शन 1200 चिपसेट सपोर्टेड फोन असेल.

मीडियाटेकचा फ्लॅगशिप डायमेन्शन 1200 एसओसी चिपसेट 6 एनएम मॅन्युफॅक्चर रिंग प्रक्रियेवर आधारित एक ऑक्टा-कोर चिपसेट आहे, ज्याचा स्पीड जास्तीत जास्त 3 गीगाहर्ट्ज इतकी आहे. या चिपसेटमध्ये 5 जी आणि वायफाय 6 चा सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन कॉर्टेक्स ए478 परफॉरमन्स कोअरसह सादर केला जाणार आहे. ज्याचा जास्तीत जास्त स्पीड 3.0 गीगाहर्ट्ज इतका असेल. तीन एक्स्ट्रा ए78 कोरचा स्पीड 2.6 गीगाहर्ट्झ इतका असेल.

वनप्लस 9 बाबत अनेक लीक्सद्वारे वेगवेगळी माहिती आतापर्यंत समोर आली आहे. नुकत्याच लीक झालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 स्नॅपड्रॅगन 888 SoC द्वारे चालणारा स्मार्टफोन असेल. यामध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, OnePlus 9 Lite चा समावेश आहे. टिपस्टर TechDroider द्वारे मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 मध्ये एक 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 402 पीपीआय पिक्सेल डेन्सिटीसह 6.55 इंचांचा फुल-एचडी + (1080 x 2400 पिक्सेल) डिस्प्ले (Full HD+ Display) दिला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

Motorola चे दोन दमदार स्मार्टफोन भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, किंमत 9 हजारांहून कमी, Realme चा दमदार स्मार्टफोन लाँच

12 वर्कआऊट मोड्ससह Oppo चा फिटनेस बँड लाँच होणार

(OnePlus Final Horizon sale is offering big discounts on Power Bank, Buds Z TWS)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें