लवकरच लाँच होणार OnePlus Nord 2, या फोनमध्ये काय असेल खास

लवकरच लाँच होणार OnePlus Nord 2, या फोनमध्ये काय असेल खास
OnePlus Nord 2

वनप्लस (OnePlus) कंपनी त्यांची नवीन फ्लॅगशिप वनप्लस 9 सिरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. (OnePlus Nord 2 can be launched soon)

अक्षय चोरगे

| Edited By: Rohit Dhamnaskar

Mar 07, 2021 | 8:17 AM

मुंबई : वनप्लस (OnePlus) कंपनी त्यांची नवीन फ्लॅगशिप वनप्लस 9 सिरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत कंपनी नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) हा स्मार्टफोनदेखील लाँच करू शकते. अँड्रॉयड सेंट्रलच्या मते, नॉर्ड 2 मीडियाटेकचा डायमेन्शन 1200 चिपसेट सपोर्टेड फोन असेल. (OnePlus Nord 2 can be launched soon know specs and features)

मीडियाटेकचा फ्लॅगशिप डायमेन्शन 1200 एसओसी चिपसेट 6 एनएम मॅन्युफॅक्चर रिंग प्रक्रियेवर आधारित एक ऑक्टा-कोर चिपसेट आहे, ज्याचा स्पीड जास्तीत जास्त 3 गीगाहर्ट्ज इतकी आहे. या चिपसेटमध्ये 5 जी आणि वायफाय 6 चा सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन कॉर्टेक्स ए478 परफॉरमन्स कोअरसह सादर केला जाणार आहे. ज्याचा जास्तीत जास्त स्पीड 3.0 गीगाहर्ट्ज इतका असेल. तीन एक्स्ट्रा ए78 कोरचा स्पीड 2.6 गीगाहर्ट्झ इतका असेल.

वनप्लस 9 बाबत अनेक लीक्सद्वारे वेगवेगळी माहिती आतापर्यंत समोर आली आहे. नुकत्याच लीक झालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 स्नॅपड्रॅगन 888 SoC द्वारे चालणारा स्मार्टफोन असेल. यामध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, OnePlus 9 Lite चा समावेश आहे. टिपस्टर TechDroider द्वारे मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 मध्ये एक 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 402 पीपीआय पिक्सेल डेन्सिटीसह 6.55 इंचांचा फुल-एचडी + (1080 x 2400 पिक्सेल) डिस्प्ले (Full HD+ Display) दिला जाण्याची शक्यता आहे.

48 मेगापिक्सलचा कॅमेरा

स्मार्टफोन बनवणारी चिनी कंपनी वनप्लस 9 हा स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरियंटसह सादर करणार आहे. यामधील एक वेरियंट 8GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजसह सादर केलं जाईल. तर दुसरं वेरियंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज स्पेससह सादर केलं जाण्याची शक्यता आहे. लीक्समधील माहितीनुसार वनप्लस 9 फोनमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि सेकेंडरी कॅमेरा म्हणून 48MP चा सेंसर आणि 8MP टर्शरी सेंसर दिला जाईल. सोबतच फोनमध्ये OIS सपोर्टसह 12 मेगापिेक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC आणि अॅड्रेनो 660 GPU द्वारे संचालित या फोनमध्ये एक पावरफुल 4,500mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

पॉवरफुल बॅटरी

OnePlus 9 स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जरसह 8K रेकॉर्डिंग आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी दिली जाणार आहे. तसेच हा फोन 30W फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाणार आहे. अनेक लीक्स आणि रिपोर्ट्समध्ये OnePlus 9 स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत विविध दावे केले जात आहेत. दरम्यान, या फोनच्या लाँचिंगबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

इतर बातम्या

ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, किंमत 9 हजारांहून कमी, Realme चा दमदार स्मार्टफोन लाँच

क्रेडिट कार्डपेक्षाही लहान आहे 4G स्मार्टफोन, धमाकेदार आहे फीचर्स

ठरलं! ‘या’ दिवशी लाँच होणार OPPO F19 Pro 5G स्मार्टफोन, फीचर्स लीक

(OnePlus Nord 2 can be launched soon know specs and features)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें