AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 वर्कआऊट मोड्ससह Oppo चा फिटनेस बँड लाँच होणार

Oppo Band Style हा ओप्पो कंपनीचा पहिला फिटनेस बँड असणार आहे. हा फिटनेस बँड 8 मार्चला लाँच केला जाईल. (Oppo fitness Band)

12 वर्कआऊट मोड्ससह Oppo चा फिटनेस बँड लाँच होणार
| Edited By: | Updated on: Mar 05, 2021 | 7:21 AM
Share

मुंबई : Oppo ही मोबाईल निर्माती कंपनी लवकरच फिटनेस बँड लाँच करणार आहे. ओप्पो बँड स्टाईल (Oppo Band Style) हा या कंपनीचा पहिला फिटनेस बँड असणार आहे. अनेक टेक कंपन्यांनी स्वतःचे फिटनेस बँड लॉन्च केले आहेत आणि आता Oppo कंपनीदेखील त्यांचा पहिला बँड लॉन्च करीत आहे. कंपनी 8 मार्च रोजी त्यांची F19 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजसोबत कंपनी हा फिटनेस बँडदेखील लाँच करणार आहे. (Oppo will launch their first fitness Band on March 8 named as Band Style)

12 वर्कआऊट मोड्स

कोणत्याही स्टँडर्ड फिटनेस बँडप्रमाणे हादेखील एक एंट्री लेव्हल सेगमेंटमधील बँड असेल. रियल टाईम हार्ट रेट मॉनिटरिंग आणि SpO2 मेजरमेंटसह हा बँड सादर केला जाणार आहे. कंपनीने म्हटलं आहे की, या बँडमध्ये तुम्हाला तब्बल 12 वर्कआऊट मोड्स मिळतील.

शाओमी, वनप्लसच्या पावलावर पाऊल

वनप्लस या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने काही दिवसांपूर्वी त्यांचा फिटनेस बँड लाँच केला होता. तर शाओमीने आतापर्यंत 5 फिटनेस बँड सादर केले आहेत. शाओमी आणि वनप्लसपाठोपाठ आता ओप्पोदेखील त्यांचा फिटनेस बँड सादर करत आहे.

ऑक्सिमीटर फीचर मिळणार

ओप्पोने आतापर्यंत या Oppo Band Style च्या वैशिष्ट्यांविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. फिटनेस बँड रिअल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंगसह येईल. त्याच वेळी, Spo2 मॉनिटरिंग देखील प्रदान केलं जाईल जे स्लीप डिसऑर्डर डिटेक्ट करेल. गेल्या वर्षीपासून ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे. त्यामुळेच कंपन्या आता प्रत्येक स्मार्टवॉचमध्ये ऑक्सिमीटर फीचर देत आहे.

Android सपोर्ट मिळणार

या फिटनेस बँडमध्ये तुम्हाला 12 वर्कआउट मोड्स मिळतील, ज्यामध्ये रनिंग, वॉकिंग, सायक्लिंग, स्विमिंग, बॅडमिंटन, क्रिकेट, योगा आणि इतर मोड्सचा समावेश आहे. हे सर्व मोड हेटॅप हेल्थ अ‍ॅप वरून सक्रिय केले जाऊ शकतात. या बँडमध्ये तुम्हाला Android सपोर्ट मिळेल. या बँडची किंमत किती असेल, याचा खुलासा अद्याप कंपनीने केला नाही.

इतर बातम्या

शाओमीचा रिअलमीच्या सीईओवर खोटे बोलण्याचा आरोप, कंपनीने ट्विटरवर शेअर केले प्रकरण

ठरलं! ‘या’ दिवशी लाँच होणार OPPO F19 Pro 5G स्मार्टफोन, फीचर्स लीक

(Oppo will launch their first fitness Band on March 8 named as Band Style)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.