AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाओमीचा रिअलमीच्या सीईओवर खोटे बोलण्याचा आरोप, कंपनीने ट्विटरवर शेअर केले प्रकरण

शाओमीचा रिअलमीच्या सीईओवर खोटे बोलण्याचा आरोप, कंपनीने ट्विटरवर शेअर केले प्रकरण (Xiaomi accused of lying to Realme's CEO madhav seth)

शाओमीचा रिअलमीच्या सीईओवर खोटे बोलण्याचा आरोप, कंपनीने ट्विटरवर शेअर केले प्रकरण
शाओमीचा रिअलमीच्या सीईओवर खोटे बोलण्याचा आरोप
| Updated on: Mar 04, 2021 | 2:29 PM
Share

नवी दिल्ली : शाओमी आणि रिअॅलिटी हे असे दोन कंज्युमर टेक्नोलॉजी ब्राण्ड आहेत जे चीनमधून आले आहेत आणि सध्या या दोघांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. शाओमी लगातार भारतात पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसरीकडे रिअलमीसुद्धा भारतीयांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. आतापर्यंत दोन्ही कंपन्या त्यांच्या डिव्हाईसच्या मदतीने एकमेकांना लक्ष्य करीत होत्या परंतु सध्या दोन कंपन्यांमध्ये एका मोबाईल फिचरवरुन टक्कर दिसत आहे. (Xiaomi accused of lying to Realme’s CEO madhav seth)

दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या ट्विटर वॉर सुरु असून शाओमीची सब-ब्रँड डायरेक्टर स्नेहा ताईनवाला यांनी रिअलमीचे सीईओ माधव सेठ यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला आहे. माधव आपल्या खोट्या बोलण्याने ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रिअलमी नेहमीच आपले डिव्हाईस व वैशिष्ट्ये ट्विटरवर पोस्ट करते. कंपनीने आता रिअलमी 8 सिरीजबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

माधव सेठ यांचे ट्विट

माधव यांनी ट्विटरवर आपल्या फोनच्या नवीन वैशिष्ट्यांबद्दल पोस्ट केले आणि म्हटले आहे की, रिअलमी ही पहिली कंपनी आहे जिने जगाला 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. या दरम्यान माधव रिअलमी एक्सटी(Realme XT)चा संदर्भ देत होते. या दरम्यान, स्नेहाने माधवच्या ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि म्हटले आहे की, शाओमी रेडमी नोट 8 प्रो हा जगातील पहिला फोन होता ज्याचा 64-मेगापिक्सलचा कॅमेरा होता. हे डिव्हाईस ऑगस्ट 2019 मध्ये लाँच केले गेले होते.

2019 मध्ये शाओमीने लाँच केला फोन

शाओमीने रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोन आपल्या स्वदेशी चीनमध्ये 29 ऑगस्ट 2019 रोजी लाँच केला होता. यानंतर एका आठवड्याने, रिअलमी एक्सटी लाँच केले गेले, ज्यास कंपनीच्या रिअलमी 5 स्मार्टफोन सिरीजमध्ये समाविष्ट केले गेले. अशा परिस्थितीत प्रथम कोणत्या कंपनीने सर्वात आधी स्मार्टफोन लाँच केला याचा निर्णय आता चाहतेच घेतील.

रिअलमीने लॉन्च केला 108MP वाला कॅमरा फोन

रिअलमीने 108 मेगापिक्सलचा कॅमेरा फोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन 8 सिरीजमध्ये ती आणला आहे. या 8 सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये शार्प फोटो क्वालिटी, जगातील पहिला टिल्ट-शिफ्ट टाईम-लॅप्स व्हिडिओ, स्टॅरी टाईम-लॅप्स व्हिडिओ आणि नवीन पोर्ट्रेट फिल्टर्स असतील. कंपनीने आपल्या स्मार्टफोनमध्ये जगातील पहिला स्टॅरी टाईम-लॅप्स व्हिडिओ देखील लाँच केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, स्टॅरी टाईम-लॅप्स व्हिडिओ विकसित करणे आव्हानात्मक आहे, कारण यात फोटोंचे संकलन संभाळण्यासाठी दमदार कामगिरीची आवश्यकता आहे. (Xiaomi accused of lying to Realme’s CEO madhav seth)

इतर बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी प्राधान्य द्या, सुप्रीम कोर्टाचे खासगी रुग्णालयांना निर्देश

Scholarship Scheme: 9 वी ते 12वीच्या 1 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजारांची शिष्यवृत्ती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.