Scholarship Scheme: 9 वी ते 12वीच्या 1 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजारांची शिष्यवृत्ती

नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजनेची सुरुवात नववीच्या वर्गापासून होते. National Means Cum-Merit Scholarship Scheme

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:53 PM, 4 Mar 2021
Scholarship Scheme: 9 वी ते 12वीच्या 1 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजारांची शिष्यवृत्ती
सांकेतिक फोटो

National Means Cum-Merit Scholarship Scheme नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकरडून स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिपचं नाव नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप आहे. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना मदत केली जाते. ही स्कॉलरशिप 9 वी ते 12 वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. (National Means Cum-Merit Scholarship Scheme know full details about scheme)

स्कॉलरशिपसाठी अर्ज कुठे करणार?

या स्कॉलरशिपचा लाभ विद्यार्थ्यांनी 9 वी ते 12 वीच्या दरम्यान शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो. ही शिष्यवृत्ती 8 वीच्या वर्गानंतर सुरु होते. आठवीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना किमान 55 टक्के गुण मिळवणं आवश्यक असते. सातवीच्या वर्गातही किमान 55 टक्के गुण मिळवणं आवश्यक असतं. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

1 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना दिला जातो. देशभराती 1 लाख विद्यार्थ्यांना 12 हजार रुपये दिले जातात.

ऑनलाईन अर्ज कधी करणार

पात्र विद्यार्थी या योजनेला लाभ घेण्यासाठी ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात अर्ज करु शकतात. इच्छुक आणि पात्र विद्यार्थी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप या योजनेसाठी अर्ज करु शकतात. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) scholarships.gov.in वर जाऊन विद्यार्थ्यी किंवा त्यांचे पालक, शाळा अर्ज करु शकतात. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटला भेट द्यावी.

संबंधित बातम्या:

RTE अंतर्गत प्रवेश नोंदणी सुरु, 96 हजार विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण

JEE Main 2021 फेब्रुवारी सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, ‘या’ दिवशी निकाल जाहीर होणार

Kishore Scientific Incentive Scheme | विद्यार्थ्यांना दर महिना मिळणार 5 ते 7 हजार, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना नेमकी काय?

(National Means Cum-Merit Scholarship Scheme know full details about scheme)