AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंटरनेटशिवाय WhatsApp वरुन व्हॉईस, व्हिडीओ कॉल करा, जाणून घ्या कसं असेल नवं फीचर

मोठ्या प्रतीक्षेनंतर WhatsApp ने अलीकडेच डेस्कटॉप अ‍ॅपमध्ये व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर अपडेट केलं आहे.

इंटरनेटशिवाय WhatsApp वरुन व्हॉईस, व्हिडीओ कॉल करा, जाणून घ्या कसं असेल नवं फीचर
WhatsApp call
| Updated on: Mar 07, 2021 | 2:44 PM
Share

मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर WhatsApp ने अलीकडेच डेस्कटॉप अ‍ॅपमध्ये व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर अपडेट केलं आहे. याचा अर्थ असा की व्हॉट्सअ‍ॅप युजर्स डेस्कटॉप अ‍ॅपद्वारे त्यांच्या मित्रांशी आणि ओळखीच्या लोकांशी WhatsApp Call वर बोलू शकतात. तथापि, डेस्कटॉप अॅपवरून कॉल करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसमध्ये मायक्रोफोन आणि वेबकॅम सपोर्ट असायला हवा. (WhatsApp Desktop can call anyone if their smartphone is not connected to Internet)

या नव्या फीचरमुळे तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटवरुन प्रत्येकाशी वन टू वन व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉलद्वारे बोलू शकता. तथापि, डेस्कटॉप व्हर्जनमध्ये ग्रुप व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉलिंग सपोर्ट नाही, म्हणजेच आपण एकावेळी फक्त एकाच युजरशी कॉल करून बोलू शकता. युजर्सना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी कंपनीने पोट्रेट आणि लँडस्केप मोड अशा दोन्हींचा पर्याय दिला आहे. तसेच युजर्स त्यांच्या फोनमध्ये इंटरनेट नसलं तरीही त्यांच्या मित्रांशी व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलद्वारे बोलू शकतात. फक्त त्यासाठी युजर्सना थोडी वाट पाहावी लागेल.

इंटरनेटशिवाय कॉल करता येणार

व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित माहिती देणारी वेबसाइट WABetaInfo ने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. WABetaInfo ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर तुमचा फोन इंटरनेटशी कनेक्ट नसला तरीदेखील तुमच्या डेस्कटॉप कॉलमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. भविष्यातील अपडेट्समध्ये मल्टी-डिव्हाइस सपोर्टनंतर, फोनमध्ये इंटरनेट नसले तरीही आपण कॉल आणि मेसेज करु शकाल.

मल्टी डिव्हाइस सपोर्ट म्हणजे काय?

व्हॉट्सअ‍ॅप बर्‍याच दिवसांपासून मल्टी-डिव्हाइस सपोर्टवर काम करत आहे आणि लवकरच ते लाँच केलं जाईल अशी अपेक्षा आहे. या फीचरबद्दल सर्वात विशेष बाब म्हणजे मुख्य डिव्हाइसमध्ये इंटरनेट नसले तरीही ते इतर डिव्हाइसमध्ये काम करेल. WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये 2.21.1.1 हे फीचर स्पॉट केले.

तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही : व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या गोपनीयता धोरणात (Privacy policy) बदल केले आहेत. याबाबत कंपनीने म्हटलं आहे की, “तुम्ही आमच्या अॅपद्वारे तुमच्या मित्रांसह कुटूंबाशी गप्पा मारता, तुमचं हे चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या गोपनीयतेस (प्रायव्हसीला) कोणताही धोका नाही”. व्हॉट्सअॅपने त्यांच्या नवीन निवेदनात म्हटले आहे की, “कंपनी तुमच्या खासगी संदेशांचे संरक्षण करते. कंपनी तुमचे कॉल्स ऐकत नाही किंवा फेसबुकसोबत शेअर करत नाही. तुमच्या गप्पा, ग्रुप्स आणि कॉल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड आहेत. आम्ही कोणत्याही युजरचे लॉग्स (कॉल लॉग्स, चॅट डिटेल्स) सेव्ह करत नाही. तुम्ही कधी आणि कोणाशी बोलत आहात, याबाबतची माहिती आमच्याकडे साठवून ठेवली जात नाही.”

व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही शेअर केलेले लोकेशन्स प्रायव्हेट असतात. तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट आमच्या सर्व्हरमध्ये अपलोड केलेली असते परंतु आम्ही ती कधीही फेसबुकसोबत शेअर करत नाही. क्रॉस मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि व्हॉईस ओव्हर आयपी सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या या कंपनीने पुन्हा एकदा नव्या गोपनियता धोरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यापूर्वीदेखील कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, नव्या गोपनीयता धोरणाचा केवळ बिझनेस अकाऊंट्सवर परिणाम होईल.

इतर बातम्या

15 वर्षापूर्वीचं ट्विट विक्रीला; 2 कोटी रुपये किंमत; वाचा नेमकं प्रकरण काय?

भारतीय महिला कोणत्या विषयांवर सर्वाधिक चर्चा करतात? ट्विटरने केले उघड

WhatsApp वरील फोटोज आपोआप डिलीट करणारं नवं फीचर येतंय, जाणून घ्या कसं असेल फीचर

(WhatsApp Desktop can call anyone if their smartphone is not connected to Internet)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.