WhatsApp वरील फोटोज आपोआप डिलीट करणारं नवं फीचर येतंय, जाणून घ्या कसं असेल फीचर

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp लवकरच त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त फीचर घेऊन येणार आहे. (Whatsapp testing self destructing mode)

WhatsApp वरील फोटोज आपोआप डिलीट करणारं नवं फीचर येतंय, जाणून घ्या कसं असेल फीचर
Whatsapp

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp लवकरच त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त फीचर घेऊन येणार आहे. या फीचरद्वारे चॅटमध्ये पाठविलेले फोटोज आपोआप डिलीट होतील. व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने ही माहिती दिली आहे. (Whatsapp is testing self destructing mode for to delete photos says WABetaInfo)

एका ट्विटमध्ये WABetaInfo ने असा दावा केला आहे की, WhatsApp सेल्फ-डिस्ट्रक्टिंग फोटो फीचरची चाचणी घेत (टेस्टिंग) आहे. यामध्ये चॅटमध्ये पाठविलेला फोटो आपोआप डिलीट केला जाईल. कंपनी Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी या फीचरचं टेस्टिंग करत आहे.

दरम्यान, WABetaInfo ने असेही म्हटले आहे की, सेल्फ-डिस्ट्रक्टिंग मोडमध्ये पाठविलेले फोटो अ‍ॅपवरून कोणालाही पुन्हा कोणालाही पाठवता येणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की वापरकर्त्यांना (युजर्सना) हे फोटो फोनच्या गॅलरीत मिळणार नाहीतच, सोबत WhatsApp वरही मिळणार नाहीत. WABetaInfo ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एखादी व्यक्ती सेल्फ-डिस्ट्रक्टिंग मोडमध्ये पाठवलेल्या फोटोचा स्क्रीनशॉट घेत असेल तर तो फोटो पाठवणाऱ्या युजरला त्याची माहिती मिळणार नाही.

WhatsApp ने यापूर्वीच Disappearing Messages नावाचे एक फीचर दिले आहे. हे फीचर कंपनीने गेल्या वर्षी लाँच केले होते. तुम्ही जर हे फीचर वापरत असाल (Disappearing Messages मोड ऑन ठेवत असाल) तर तुम्ही पाठवलेला मेसेज सात दिवसांनंतर आपोआप डिलीट होईल. या मेसेजेमध्ये तुम्ही फोटो-व्हिडीओचा वापर केला असला तरीदेखील ती फाईल डिलीट केली जाईल.

…तर 15 मेपासून बंद होतील मेसेज

व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी (WhatsApp Privacy Policy) 15 मेपासून लागू होणार आहे. व्हॉट्सअॅपने जानेवारीमध्येच यासंबंधी माहिती दिली आहे. यासाठी आता काही महिनेच शिल्लक आहे. त्यामुळे तुम्हीही जर व्हॉट्सअ‍ॅप वापर असाल तर त्याची नवीन धोरणं वापरणं महत्त्वाचं आहे. अन्यथा यामुळे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. जर 15 तारखेला होणाऱ्या बदलांचा तुम्ही स्विकार केला नाही तर तुम्हाला WhatsApp Message आणि कॉल करता येणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने सर्व माध्यमांमधून यासंबंधी नियम जारी केले आहेत. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्विकारली नाही तर 15 मेपासून आपलं खातं वापरू शकणार नाही. एखादा युझर डेटा कशा पद्धतीने व्यवस्थापित करतो तसंच फेसबुक या कंपनीसह विविध प्रकारची माहिती कशी शेअर करतो, याबद्दलचं धोरण नव्या व्हॉट्सअ‌ॅप अपडेटमध्ये असणार आहे.

आम्ही नव्या अटी (terms) आणि गोपनियता धोरण (privacy Policy) आणत असल्याचं नोटिफिकेशन व्हॉट्स‌अ‌ॅपने आपल्या युझर्सना पाठवण्यास सुरुवात केलं आहे. तसंच युझर्सना नवीन धोरणाला सहमती देण्यासही सांगितलं आहे.

व्हॉट्स‌अ‌ॅपच्या नव्या अटी आणि शर्थी…

– व्हॉट्सअ‌ॅप डेटा कसा वापरतो यावरील अधिक माहिती

– व्हॉट्सअ‌ॅप अकाउंटशी चॅट करण्यात बदल

– व्हॉट्सअप डेटा फेसबुकसह अन्य कंपनीला कसा शेअर करतं

व्हॉट्सअ‌ॅपचे नवे अपडेट….

– व्हॉट्सॲप वेब आणि डेस्कटॉप ॲपवरुन कॉलिंगची सुविधा

– व्हिडीओ म्यूट

– Read later

– मिस्ड कॉल्स कधीही जॉईन करता येणार

इतर बातम्या

Instagram लाईव्हमध्ये एकाच वेळी चार जणांशी गप्पा मारा, आतापर्यंतचं बेस्ट फीचर सादर

Reliance Jio कडून 5 जी लाँचची तयारी; 57 हजार कोटींच्या सर्वात मोठ्या स्पेक्ट्रमची खरेदी

Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट प्रीपेड प्लॅन्स, वारंवार रिचार्ज करण्यापासून सुट्टी

(Whatsapp is testing self destructing mode for to delete photos says WABetaInfo)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI