AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट प्रीपेड प्लॅन्स, वारंवार रिचार्ज करण्यापासून सुट्टी

तुम्ही जर वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासाला कंटाळला असाल आणि मोठ्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट प्रीपेड प्लॅन्स, वारंवार रिचार्ज करण्यापासून सुट्टी
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 02, 2021 | 7:00 PM
Share

मुंबई : तुम्ही जर वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासाला कंटाळला असाल आणि दीर्घ (मोठ्या) वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला जियो (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone – Idea) निवडक प्रीपेड प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. हे प्लॅन्स एक वर्ष किंवा त्याहून अधिक वैधतेसह उपलब्ध आहेत. (Jio, Airtel and Vi long term prepaid plans to buy in march 2021, offers high speed data with unlimited calling)

Jio चा 2,399 रुपयांचा प्लॅन : जियोचा हा रिचार्ज प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल. तसेच युजर्स कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड कॉल करु शकतात. सोबतच या प्लॅन्समध्ये युजर्सना जियोच्या सर्व प्रिमियम अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मिळेल.

Airtel चा 2,498 रुपयांचा प्लॅन : एयरटेलचा (Airtel) हा रिचार्ज प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधी मिळेल. सोबतच युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल्स करु शकतात. सोबतच युजर्सना या प्लॅनमध्ये अमेझॉन प्राईम, विंक म्युझिक आणि एअरटेल एक्स्ट्रिमचं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जाईल.

Vodafone-Idea चा 2,399 रुपयांचा प्लॅन : वोडाफोन-आयडियाच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा देण्यात अली आहे. सोबतच ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. कंपनीने युजर्सना लाईव्ह टीव्ही आणि अनलिमिटेड मूव्ही सब्सक्रिप्शन दिलं आहे.

1,999 रुपयांमध्ये फोन आणि बरंच काही वर्षभरासाठी FREE

जर तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करुन करुन कंटाळला असाल, नवीन फोन (Reliance Jiophone New Three Offer) घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ग्राहकांसाठी नेहमी धमाकेदार ऑफर आणणारी कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) तीन अशा ऑफर घेऊन आली आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा रिचार्ज केल्यावर तुमचं वर्षभरासाठीचं झंझट मिटेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जियोच्या या ऑफरची सुरुवात 1 मार्चपासून झाली आहे. यामध्ये तुम्हाला 1,999 रुपयांमध्ये एक फोन आणि दोन वर्षांसाठी अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळेल. त्याशिवाय, तुम्ही इतरही अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

संबंधित बातम्या

Jio चा धमाकेदार प्लान! फक्त 3.86 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, वाचा काय आहे ऑफर

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच

गुगलचे फ्री स्टोरेज पर्याय बंद होणार, जाणून घ्या कसे कराल तुमचा डेटा स्टोरेज?

2 वर्षांचा अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन, 1999 रुपयांचा JioPhone कुठून खरेदी करणार?

(Jio, Airtel and Vi long term prepaid plans to buy in march 2021, offers high speed data with unlimited calling)

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?