Jio चा धमाकेदार प्लान! फक्त 3.86 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, वाचा काय आहे ऑफर

कंपनीने अशी ऑफर आणली आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज पाच रुपयांपेक्षा कमी किंमतीत अमर्यादित डेटा, फ्री कॉलिंग आणि एसएमएस मिळवू शकता.

Jio चा धमाकेदार प्लान! फक्त 3.86 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, वाचा काय आहे ऑफर
रिलायन्स जिओचे तीन सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

मुंबई : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणत असते. पण आता कंपनीने अशी ऑफर आणली आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज पाच रुपयांपेक्षा कमी किंमतीत अमर्यादित डेटा, फ्री कॉलिंग आणि एसएमएस मिळवू शकता. ही खास ऑफर ग्राहकांच्या फायद्याची असून तुम्हीही इंटरनेटचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. (jio best offer plan get unlimited calling unlimited internet facility by spending more than rs 3 only)

इतकंच नाहीतर रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला जियो अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन विनामूल्य मिळणार आहे. यामध्ये दररोज 5 रुपयांपेक्षा कमी पैसे देऊन तुम्ही अनेक सुविधांचा फायदा घेऊ शकता. नेमका काय आहे प्लॅन आणि तुम्ही याचा कसा फायदा घेऊ शकता जाणून घेऊयात.

3.86 रुपयांमध्ये मिळवा जबरदस्त फायदे

जिओच्या या योजनेत तुम्हाला 336 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. कंपनीची ही योजना 1299 रुपयांची असून जर ती 336 दिवसांनुसार पाहिली तर ग्राहकांना दिवसाला फक्त 86.86 रुपये खर्च करावे लागतील. यात तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, 24 जीबी डेटा आणि 3,600 एसएमएस मिळवू शकता. यासह, तुम्ही विनामूल्य Jio अॅप्सची सदस्यताही घेऊ शकता. दिली जाईल.

फक्त 91.91. रुपयांमध्ये अनेक ऑफरचा फायदा

जिओ 329 रुपयांची योजना 84 दिवसांसाठी देते आहे. ज्यात तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. जर ही योजना दिवसाच्या आधारे पाहिली तर तुम्हाला फक्त 3.9 रुपये द्यावे लागतील. या योजनेमध्ये 6 जीबी डेटा आणि 1000 एसएमएसचा लाभ सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यासह, तुम्ही विनामूल्य Jio अॅप्स देखील वापरू शकता.

4.6 रुपयांमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा

तुम्ही कमी दिवसांसाठी एखाद्या योजनेचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर फक्त 129 रुपयांत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. जर तुम्ही पाहिलं तर दररोज यासाठी 4.6 रुपये द्यावे लागतील. या योजनेत तुम्हाला 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस सुविधा देखील मिळेल. (jio best offer plan get unlimited calling unlimited internet facility by spending more than rs 3 only)

संबंधित बातम्या – 

डुअल कॅमेरा, 60 तास कॉलिंग, जबरदस्त बॅटरीसह नवा स्मार्टफोन बाजारात, किंमत 7 हजारांहून कमी

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच

ना Apple, ना Xiaomi, OnePlus, वर्षभरात या मोबाईलची सर्वाधिक विक्री

(jio best offer plan get unlimited calling unlimited internet facility by spending more than rs 3 only)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI